आष्टी (अशोक गर्जे): तालुक्यातील हिवरा सज्जाचे तलाठी यांच्याकडून सामान्य जनतेची पिळवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर माहिती अशी की तलाठी सज्जा हिवरा येथील तलाठी कार्यालय १५ दिवसाला एकदा उघडते
सामान्य जनतेला नाहक त्रास होत असून प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही कार्यालय उघडते १२ वाजता याची दखल कोण घेणार कधी हा प्रश्न सुटणार ? सात बारा लागत असेल तर आष्टी ला जावे लागते. हिवरा ते आष्टी अंतर ३० किमी असून तलाठी यांची सामान्य जनतेची कामे करण्याची इच्छा नसल्याची दिसून येते अशा प्रशासकीय कामगारांवर काय कार्यवाही होणार ? अशी मागणी गावागावांतून होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
सौर कृषिपंपामुळे उंचावला शेतकऱ्याचा आर्थिक स्तर
आठवडा विशेष टीम― दिवसाला आठ-दहा तास अखंडीत वीज मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी राहिली आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात वीजेच्या वेळापत्रकानुसार पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. ऐन हंगामातच अनेकदा वीजेचा लपंडाव सुरु असतो. अनेकदा सोसाट्याचा वारा सुटतो. वीजेच्या तारा, खांबांचे नुकसान होते. परिणामी वीजपुरवठा खंडीत होतो आणि शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. तसेच त्यातल्या त्यात रात्री … Read more