पवन ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या कंपन्यांचा मनमानी कारभार, क्रेन पडल्याने शेतीपिकांचे नुकसान, भरपाई देण्यास टाळाटाळ – डॉ.गणेश ढवळे

8a46b74c da84 4579 98ef 3abd4e5c2ace

लिंबागणेश(प्रतिनिधी): बीड तालुक्यातील बालाघाटावर आणि पाटोदा तालुक्यात पवन ऊर्जा प्रकल्प उभारणी कंपन्यांचा सुळसुळाट असुन शेतकऱ्यांची फसवणूक करत मनमानी कारभार सुरू असुन शासकीय पाणंद रस्त्यावर अतिक्रमण असो अथवा वाहनांसाठी रस्ता करताना संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता उभ्या पिकातुन नुकसान करत वहिवाट असो याविषयी कोणालाही न विचारता अरेरावी सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.लिंबागणेश येथील शेतकरी भैरूबा गुरुबा दाभाडे व नितिन दशरथ दाभाडे यांच्या शेतपिकांचे पवनचक्की उभारतानाचे क्रेन पडल्याने पिकांचे व झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

सोयाबीन पिकांचे तसेच झाडांचे नुकसान, भरपाई देण्यास टाळाटाळ:- भैरूबा दाभाडे

ff3b0eec 5ce3 46aa 91ab c2779f5f5010
लिंबागणेश येथील शेतकरी भैरूबा दाभाडे व नितिन दाभाडे यांच्या शेताशेजारी पवनचक्की उभारत असताना मध्यरात्री क्रेन पडल्याने झाडांचे व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत.मध्यरात्री क्रेन पडल्याने अनर्थ टळला नाहीतर एरवी दिवसा त्याच झाडाखाली माणसं आणि जनावरे बांधलेली असतात.मध्यरात्री क्रेन पडल्याने जिवित हानी झाली नाही. दुष्काळात तेरावा महिना म्हणल्याप्रमाणे गत झाली आहे.रात्रभर जागून पिकाला पाणी दिले परंतु क्रेन पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पवन प्रकल्प कंपन्यांची दादागिरी सुरू असुन जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे:- डॉ.गणेश ढवळे
89cbc520 0cd8 4a16 a00b deb4c1fca171

बीड आणि पाटोदा तालुक्यातील पवन ऊर्जा प्रकल्प उभारणी करणार-या रेणु पावर कंपनी आणि सहयोगी वेदांश इन्फ्रा कंपनी यांनी स्थानिक दलालांच्या मदतीने शेतकऱ्यांची फसवणूक करुन जमिनी कवडीमोल भावाने लुबाडलेल्याच आहेत.परंतु त्याचबरोबर ग्रामीण भागातील शिवरस्ते, पाणंद रस्ते यावर सुद्धा अतिक्रमण केले आहे.पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील शेतकरी जयवंत शिंदे यांना पवन ऊर्जा कंपन्यांनी अतिक्रमण केल्याने त्यांच्या शेतात जाण्याचा रस्ता बंद केला होता.रस्ता खुला करण्यात यावा यासाठी १५ आगस्ट स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणानंतर रस्ता खुला करून देण्यात आला. अशिक्षित शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक या कंपन्या करत असुन जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

महाविकास आघाडीत बिघाडीची दाट शक्यता-हेमंत पाटील विरोधकांच्या ‘वज्रमुठी’बद्दल संशयाचे वातावरण

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३: भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडीत आता बिघाडीची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील शरद पवारांचा गटाबद्दल जनमानसात असलेली भावनिक लाट देखील ओसरील असल्याने त्यांचे नेतृत्व कितीप्रमाणात निवडणुकीत चमत्कार घडवणार यांची चर्चा सध्या सुरू आहे,असे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय … Read more

NEET UG 2023 State Merit List in Maharashtra: Admission Process, Required Documents, and Top-Rated Medical Colleges

Screenshot 20230802 0737327E2

In India, NEET UG examination acts as a gateway for students aiming to pursue a career in medicine. Maharashtra, known for its esteemed medical institutions, garners significant attention from NEET UG aspirants. This article aims to provide an in-depth understanding of the NEET UG 2023 state merit list, admission process, essential documents, and a comprehensive list of the top-rated medical colleges in Maharashtra.

Understanding the NEET UG 2023 State Merit List:

The NEET UG 2023 state merit list holds great importance in determining eligibility for medical admissions in Maharashtra. This list is prepared based on the candidates’ NEET UG 2023 scores and subsequent counseling sessions. Its purpose is to facilitate admission to renowned medical colleges in the state.

Step-by-Step Admission Procedure:

1. Registration: The initial step requires online registration on the official website dedicated to NEET UG 2023 counseling in Maharashtra.
2. Document Verification: Candidates need to visit designated verification centers with the necessary documents to complete the verification process.
3. Publication of Merit List: The state authorities release the merit list based on candidates’ NEET UG 2023 scores and completion of document verification.
4. Choice Filling: Shortlisted candidates must select their preferred medical colleges and courses by participating in the online choice filling process.
5. Seat Allotment: After evaluating candidates’ choices and merit list rankings, the counseling authorities allocate seats accordingly.
6. Reporting to the College: Once candidates are allotted seats, they must report to their respective colleges to fulfill the admission formalities.

Required Documents for NEET UG 2023 Admission:

To ensure a smooth admission process, applicants must prepare the following essential documents:
1. NEET UG 2023 Admit Card and Scorecard: These documents validate the candidate’s eligibility and provide information about their performance in the examination.
2. Class X and XII Mark Sheets: These mark sheets are necessary for verifying the candidate’s academic performance.
3. Passing Certificate for Class X and XII: These certificates are required to validate the successful completion of the respective academic levels.
4. Domicile Certificate: This document proves the candidate’s residential status in Maharashtra.
5. Caste Certificate (if applicable): If the candidate belongs to any reserved category, a valid caste certificate must be submitted.
6. Aadhaar Card or any other valid ID proof: A government-issued ID proof is essential for identification purposes.
7. Passport-sized Photographs: Recent passport-sized photographs are needed to complete the application process.
8. Provisional Allotment Letter: This letter is provided after the seat allotment process, confirming the candidate’s admission to a specific college.
9. Gap Certificate (if applicable): In case of an academic gap, a gap certificate explaining the period must be submitted.

Top-Rated Medical Colleges in Maharashtra:

1. All India Institute of Medical Sciences (AIIMS), Nagpur: Known for providing exceptional medical education and research opportunities.
2. Armed Forces Medical College (AFMC), Pune: Renowned for producing top-notch medical professionals for the defense forces.
3. Grant Medical College, Mumbai: A prestigious institution with a rich heritage, known for its comprehensive medical programs.
4. Seth Gordhandas Sunderdas Medical College and King Edward Memorial Medical College (KEM), Mumbai: Offers an excellent academic environment and clinical training facilities.
5. B. J. Government Medical College, Pune: Prominent for its high-quality education and state-of-the-art infrastructure.
6. Government Medical College, Nagpur: An esteemed institution fostering medical excellence through rigorous training and research.
7. Government Medical College and Hospital, Aurangabad: Known for its comprehensive medical curriculum and experienced faculty.
8. Lokmanya Tilak Municipal Medical College (LTMMC), Mumbai: Offers rigorous academic programs and exposure to diverse medical fields.
9. Topiwala National Medical College (TNMC), Mumbai: Known for its excellent faculty and research opportunities.
10. Maharashtra Institute of Medical Sciences and Research (MIMER), Pune: Dedicated to providing top-quality medical education and innovative research opportunities.

Conclusion:

Securing a position in the NEET UG 2023 state merit list in Maharashtra can pave the way for admission into some of the country’s finest medical institutions. This article has provided a detailed guide on the admission process, mandatory documents, and a comprehensive list of top-rated medical colleges in Maharashtra. Be well-prepared for the NEET UG 2023 journey, as it may lead to a successful medical career within one of Maharashtra’s prestigious medical colleges.

लिंबागणेश येथे दिवसाच कमलबाई खिल्लारे यांच्या घरी चोरी

234e791c ed52 4409 9ae7 65555713c96c

आठवडा विशेष (प्रतिनिधी):

आज दि.३० जुलै रविवार रोजी सकाळी रानात कामासाठी गेलेल्या श्रीमती कमलबाई भगवान खिल्लारे वय ६० वर्षे आपल्या नातीसह पल्लवी वय १४ वर्षे दररोज प्रमाणे स्वतः:च्या शेतात कामासाठी गेले होते.सायंकाळी ५ वाजता घरी आल्या असता घराचे कुलूप तुटलेले व दार उघडे दिसले.घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. भाचा दिनेश वायभट यांना कळवले असता त्यांनी लिंबागणेश पोलिस स्टेशनचे पो.हे. राऊत संतोष यांना फोनवरून चोरीच्या घटनेची कल्पना दिली असता.पोलिस उपनिरीक्षक अजय पानपाटील व पो.हे.संतोष राऊत घटनास्थळी दाखल झाले. श्रीमती कमलबाई खिल्लारे यांच्या म्हणण्यानुसार काही रोख रक्कम व सोनं चोरीला गेल्याचे सांगितले.पुढील तपास नेकनुर पोलिस करत आहेत.

महिनाभरापासुन डोळ्याच्या आपरेशन मुळे घरीच असणा-या कमलबाई आजच शेतात कामासाठी गेल्या होत्या.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या शासकीय मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोतराज आंदोलन – डॉ.गणेश ढवळे

IMG 20230626 WA0026

बीड(दि.२६ जून): कधी नैसर्गिक संकट तर कधी प्रशासकीय धोरणामुळे शेतकरी सातत्याने अडचणीत असुन मोठ्या प्रमाणात वाढलेला उत्पादन खर्च, बियाणे यांच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ,शेतीमालाला योग्य भाव न मिळणे आदि कारणांमुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी नैराश्यातुन आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसून येते. बीड जिल्ह्यात विविध कारणास्तव शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असताना शेतकरी कुटुंबियांना देण्यात येणारी १ लाख रुपयांची शासकीय मदत देण्याबाबत सरकार आणि प्रशासनाची अनास्था दिसून येत असुन बीड जिल्ह्यात यावर्षी ६ महिन्यात ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासन दरबारी नोंद असुन प्रशासनाकडून आतापर्यंत केवळ १ मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियाला आर्थिक मदत देण्यात आली असुन मदत देण्यासाठी शासन निधी नसल्याचे कारण सांगितले जात आहे.मात्र याचवेळी स्वतः:घ्या जाहिरात बाजीवर आणि मंत्र्यांच्या दौऱ्यावर अमाप उधळपट्टी करणा-या शासनाकडे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना देण्यासाठी निधी नाही त्यामुळे सरकारच्या संवेदनहीनतेच्या व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आत्महत्येच्या १५ दिवसाच्या आत मदत मिळाली पाहिजे असे निर्देश खुद्द उच्च न्यायालयाने दिलेले असताना ६ महिने मदत मिळत नाही उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करण्याच्या शासकीय धोरणाच्या निषेधार्थ व तातडीने मदत देण्यात यावी यासाठी आज दि.२६ जुन सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत मिळावी याकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी पोतराजाची वेशभूषा परिधान करत स्वतः:च्या अंगावर चाबकाचे फटके मारुन घेत “इडा पिडा टळु दे,बळीचे राज्य येऊ दे” असे साकडे घालत लक्ष्यवेधी पोतराज आंदोलन करण्यात येऊन निवेदन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त यांना देण्यात आले यावेळी आंदोलनात शेख युनुस च-हाटकर, बलभीम उबाळे, मिलिंद सरपते, शेख मुबीन, राहुल कवठेकर,विजय झोडगे, संजय सुकाळे,धऩंजय सानप रामनाथ खोड, सुरज थोरात आदी सहभागी होते.

img 20230626 wa0027450071393306183291

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदतीचे निकष
—–
शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर त्याची नोंद पोलिस ठाण्यात केली जाते त्यानंतर गटविकास अधिकारी, तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित ठाण्याचे प्रभारी अधिकारी याबाबत चौकशी करतात .निकषात न बसणा-या स्थितीत आत्महत्या केली असेल तर अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीसाठी अपात्र ठरवले जाते.शासनाच्या निकषात बसत असेल तरच शेतकऱ्यांच्या वारसांना ७० हजार रुपयांचा धनादेश व ३० हजार रुपये वारसा किंवा पत्नीच्या नावे बँकेत डिपाजिट करण्यात येतात.मात्र १५ दिवसात मदत मिळणे बंधनकारक असताना ६ महिने होऊनही मदत मिळालीच नाही.

मराठवाड्यात ६ महिन्यात ४०४ शेतकरी आत्महत्या मदत केवळ १०कुटुंबियांनाच
—-
चालु वर्षातील जानेवारी ते जुन ६ महिन्यात मराठवाड्यात ४०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासन दरबारी नोंद असुन निधी अभावी केवळ १० शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत मिळाल्याची धक्कादायक माहिती असुन याबद्दल शासनाच्या उदासिनतेमुळे जनसामान्यामध्ये तिव्र नाराजी दिसून येत आहे.


सोयगावच्या दहा गावांना मृगाच्या पावसाची हुलकावणी; डोंगरावर डोळ्यासमोर पाऊस शेती शिवारात मात्र कोरड

IMG 20230610 WA0044

सोयगाव, ता.१०…सोयगाव सह परिसरातील दहा गावांना शनिवारी (ता.१०) सायंकाळी मृगाच्या पावसाने हुलकावणी दिली असून मात्र डोळ्या देखत डोंगर परिसरात जोरदार मृगाच्या सरी कोसळल्या मात्र दहा गावांना वादळाचा तडाखा देऊन पावसाने हुलकावणी दिली आहे त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मृगाच्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे
मृगाच्या सरींनी शनिवारी डोळ्यादेखत डोंगर रांगात आगमन केले मात्र सोयगाव सह रावेरी कंकराळा,जरंडी माळेगाव पिंप्री निंबायती बहुलखेडा रामपुरा तांडा कवली निमखेडी उमर विहिरे घोसला या तेरा गावांना मृगाच्या पावसाने हुलकावणी दिली आहे मात्र या दहा गावांच्या परिसरात डोळ्यासमोर मृगाच्या सरी कोसळल्या परंतु या दहा गावात मृगाच्या पावसाचा थेंबही न होता केवळ वादळाचा तडाखा देऊन मृगाच्या पावसाने काढता पाय घेतला होता त्यामुळे या दहा गावात मृगाच्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे डोळ्या देखत मृगाच्या सरी कोसळल्या मात्र त्याही फक्त डोंगरावर!

महाराष्ट्र चेंबरचे कार्य कौतुकास्पद : राज्यपाल रमेश बैस ;1 शेठ वालचंद हिराचंद स्मृती व्याख्यानाचे ५० वे सत्राचे आमंत्रण स्वीकारले

MaharashtraGovernorRameshBais28729News scaled

१५ जून रोजी राजभवनात होणार सोहळा

मुंबई: महाराष्ट्र चेंबरचे कार्य कौतुकास्पद असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावित असल्याचे गौरवोद्वार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. त्यासह महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाच्या ५० वे सत्राचे निमंत्रण त्यांनी स्विकारले. १५ जून २०२३ रोजी सायंकाळी ०४:०० वाजता राजभवनातील दरबार हॉल मध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी त्यांची मुंबईत भेट घेतली यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्यपाल रमेश बैस यांचा शाल, श्रीफळ, पुप्षगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.
पुढे ते म्हणाले चेंबर राज्याच्या व्यापार, उद्योगात मोठी महत्वाची भूमिका बजावित आहे. अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र चेंबरचे महत्वाचे स्थान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भेटीप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, गव्हर्निग काऊन्सिल सदस्य उत्तम शहा, नीरव देडीया, चेंबरचे सहकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्मृती व्याख्यानाची माहिती त्यांना दिली. ते म्हणाले, महाराष्ट्र चेंबरचे संस्थापक, भारताच्या उद्योग जगतातील महनीय व्यक्तिमत्व `शेठ वालचंद हिराचंद` यांच्या स्मरणार्थ दरवर्षी व्याख्यान संपन्न होते. जून महिन्यात ५० वे स्मृति व्याख्यानचा `आत्मनिर्भर भारत` असा व्याख्यानाचा विषय आहे. यापूर्वी झालेल्या व्याख्यानात सरसंघचालक मोहनजी भागवत, तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई, चिफ जस्टीस वाय. व्ही. चंद्रचूड, जस्टीस चंद्रशेखर धर्माधिकारी, तत्कालीन वित्तमंत्री मधु दंडवते, अरुण जेटली, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरुण गोवारीकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर या ज्येष्ठ मान्यवरांचे अभिभाषण झाले आहे.
अधिक माहिती देताना अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, राज्याच्या व्यापार आणि उद्योग वाढीसाठी ९५ वर्षापासून महाराष्ट्र चेंबर कार्यरत आहे. महाराष्ट्रातील विविध व्यापार आणि उद्योगांतील ८५० संस्थातील आणि ७ लाख उद्योग आणि ३० लाखांहून अधिक व्यापार संघटनेची शिखर संस्थेचे प्रतिनिधीत्व करत आहे.

राष्ट्रीय महामार्ग मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान अपघात प्रवण क्षेत्रात गतिरोधकासाठी रास्ता रोको

IMG 20230504 WA0028

बीड:अहमदनगर -अहमदपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८डी मार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रात वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता मोरगाव फाटा,मुळुकवाडी,लिंबा गणेश बसस्थानक, भालचंद्र माध्यमिक विद्यालय,महाजनवाडी फाटा,वैद्यकिन्ही,सौंदाना, सोनेगाव फाटा व ग्रामीण रूग्णालय पाटोदा याठीकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.४ मे गुरुवार रोजी सकाळी १०वा लिंबागणेश बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.निवेदन पोलिस उपनिरीक्षक नेकनुर पोलिस स्टेशन पानपाटील, पोह.डिडुळ, खांडेकर,खटाने, क्षीरसागर, ढाकणे,मंडळ अधिकारी वंजारी, तलाठी पोतदार, कार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी आंदोलनात ज्येष्ठ मार्गदर्शक राजेभाऊ आप्पा गिरे, सरपंच बालासाहेब जाधव, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते रविंद्र निर्मळ, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, लेहनाजी गायकवाड सुरेश निर्मळ , विक्रांत वाणी, अशोक वाणी,दादा गायकवाड, हरिओम क्षीरसागर जितेंद्र निर्मळ, तुळशीराम पवार, स्वप्निल वक्ते,अजय थोरात, शंकर निर्मळ आदि.सहभागी झाले होते.

गतिरोधक नसल्याने भालचंद्र विद्यालयातील शालेय मुलांची सुरक्षा धोक्यात

—–
लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर असुन गतिरोधक नसल्याने त्यांच्या सुरक्षितता धोक्यात आली असून वारंवार याठिकाणी अपघात घडत आहेत. यापुर्वीही दि.२८आगस्ट २०२१ रोजी भालचंद्र माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांनी गतिरोधकाची मागणी करत अपघातात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून “श्रद्धांजली गांधीगिरी”आंदोलन केले होते.

बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती महादेव भारती आंदोलनात सामील ,


शालेय मुलांच्या जीवन मरणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यामूळे आजच्या आंदोलनात बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती महादेव भारती महाराज सामिल झाले होते.आंदोलना दरम्यान आजारी रूग्णाला रस्ता मोकळा करून दिला.

वरठाण ,बनोटी परिसरात गारपिटीने तडाखा ;कापणी केलेले मका पीक भिजले

घोसला,(ज्ञानेश्वर युवरे ) दि.१५: सोयगाव तालुक्यातील बनोटी परिसरातील बनोटी वरठाण सह पाच गावांना शनिवारी सायंकाळी सहा वाजता दहा मिनिटे गारपिटीसह अवकाळीच्या पाऊस झाला त्यामुळे उन्हाळी पिकांसह कापाणी केलेले मका पिके धोक्यात आली आहे दरम्यान निंबच्या आकाराच्या गारांचा झोडपा पाच गावांना बसला आहे
सोयगाव तालुक्यात दिवस भर उन्हाची काहिली असतांना अचानक सायंकाळी बनोटी सह वरठाण,पळाशी,वाडी तिडका आणि नायगाव या गावांना अचानक गारपीट सह अवकाळी पावसाने हजेरी लावली दरम्यान पावसा पेक्षा गारांचाच पाऊस अधिक होता त्यामुळे उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला असून कापणी केलेल्या मका गहू सूर्यफूल आदी रब्बीच्या पिकं काढणी आधीच शेतात भिजली आहे त्यामुळे सीयगाव तालुक्याला मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात तीनवेळा गारपिटीने झोडपले असल्याची नोंद आपत्ती निवारण विभागात शनिवारी रात्री करण्यात आली आहे …

कर्जत येथे तालूका पत्रकार संघ व जिल्हा पत्रकार संघ सन्मान सोहळ्याव्याला उपस्थित रहा – पवार, पठाण

Picsart 23 04 06 04 16 09 845 scaled

खा.संजय राऊत, मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, आ.रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती

पाटोदा / प्रतिनीधी:

मराठी पञकार परीषदेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजीत आदर्श तालूका व जिल्हा संघाचा सन्मान सोहळा. तालूकाध्यक्षाचा मेळावा शुक्रवार ७ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. शिवसेना नेते सामनाचे कार्यकारी संपादक राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रमूख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास बीड जिल्ह्यातील पत्रकार संघाने सहभागी व्हावे व मोठ्या संख्येने पञकार बांधवानी उपस्थीत राहवे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे पाटोदा तालुकाध्यक्ष सचिन पवार शहराध्यक्ष हमीदखान पठाण यांनी केले आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या धयेयधोरणा नुसार सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील ४८ तालुका पत्रकार संघांना परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ६ जिल्हा संघांना देखील सन्मानीत करण्यात आले आहे. राज्यातील अनेक तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पत्रकार संघटन मजबुत करण्या बरोबरच पत्रकारांचे हक्क आणि माध्यम स्वातंत्र्या साठी काम करीत असतात. त्याच बरोबर सामाजिक बांधीलकी जपत विविध सामाजिक उपक्रम देखील राबवित असतात. त्यांच्या या कार्याचं राज्यस्तरावर कौतूक व्हावं, राज्य पातळीवर त्याच्या कामाची दखल घेतली जावी यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सहा वर्षां पासून परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. वसंतराव काणे यांच्या नावाने आदर्श तालुका पत्रकार संघ आणि स्व. रंगाआण्णा वैध यांच्या नावे आदर्श जिल्हा संघ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. हे सोहळे प्रामुख्याने ग्रामीण भागात घेतले जातात यावर्षीचे हे सातवे वर्ष असून कर्जत (जिल्हा अहमदनगर) येथे खा. संजय राऊत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. आ. रोहीत पवार हे मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे तर यावेळी विश्वस्त किरण नाईक व अध्यक्ष शरद पाबळे, राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन, अनिल वाघमारे, सुभाष चौरे, विशाल साळुंखे व इतर पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत.कर्जत येथे शुक्रवारी होत असलेल्या सोहळ्यास पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे पाटोदा तालुकाध्यक्ष सचिन पवार व शहराध्यक्ष हमीदखान पठाण यांनी केले आहे..

वन्यजीवांसाठी पानवठे की वनविभागातील आधिका-यांचे पोटभरणासाठी पाणपोई ;शंभर फुटावर रस्ता तर ५०० फुटावर खडीक्रशर मशिन

IMG 20230402 WA0045

बीड(प्रतिनिधी): बीड तालुक्यातील करचुंडी गटातील वनविभागातील आधिका-यांनी वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पानवठ्यांच्या नावाखाली लिंबागणेश ते पालवण रस्त्यावर नामाजीबुवा देवस्थान समोर १०० फुट अंतरावर नविन पानवठे बांधण्यात आले असून शेजारीच ५०० फुट अंतरावर खडीक्रशर मशिन सुरु असुन या ठिकाणी वन्यजीव कसे पाणी पिण्यासाठी येणार?मग हे पानवठे वन्यजीव प्राण्यांसाठी बांधले आहेत की वनविभागातील आधिका-यांचे पोट भरण्यासाठी बांधलेल्या पाणपोई आहेत असा प्रश्न पडला आहे.

परभणी जिल्ह्यातील कमी मजुरीवर वनमजुर, कागदोपत्री मात्र वनविभागातील आधिकारी -कर्मचा-यांचे नातेवाईक
—-
वनविभागाच्या सीसीटी, चर खोदणे आदि.कामासाठी परभणी जिल्ह्यातील मजुर असुन त्यांच्याकडुन कमी मजुरीत काम करून घेतले जाते मात्र रजिस्टर वर वनविभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे नातेवाईक, जवळची मित्र मंडळी यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होतात. संबंधित प्रकरणात सखोल चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे.

पाण्यासाठी वणवण, पिंपरनई गावच्या जनावरांना बेलगावच्या भोनाई तलावाचा आधार – डाॅ.गणेश ढवळे

IMG 20230402 WA0024

लिंबागणेश (प्रतिनिधी): ऊन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत असुन गावतलावातील पाण्याची पातळी खालावली असुन जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गाव सोडून शेजार गावच्या शिवारातील साठवण तलावावर जनावरांची तहान भागवावी लागत असून अजुन एप्रिल-जुनचा उन्हाळा आणखी कडक जाणार असल्याने पशुपालक चिंतेत आहेत.

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण:- रामचंद्र वायभट (पिंपरनई शेळीपालक)

बीड तालुक्यातील मौजे.पिपरनई येथील रामराव वायभट यांच्या ५० शेळ्या तसेच ईतर म्हशी, गाय-बैल, यांना पिंपरनई येथील तलाव आडवळणी असल्या कारणाने बेलगाव शिवारातील बेलेश्वर मंदिर परीसरातील भोनाई तलावाचा आसरा घ्यावा लागत आहे.

जिल्हाप्रशासनाचा पाणीटंचाई आराखडा कागदावरच कठोर उपाययोजना राबवावी:- डाॅ.गणेश ढवळे

हिंदी महासागरात निर्माण झालेल्या अल-निनो प्रभाव मान्सुनवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन त्या अनुषंगानेच आगामी काळात पाणीटंचाई जाणवु नये यासाठी जिल्हाप्रशासनाने निवासी उपजिल्हाधिकारी बीड पाणीटंचाई विभाग संतोष राऊत यांच्या आदेशाने पाटबंधारे प्रकल्पाच्या ठिकाणी विद्युत मोटारी व अन्य साधनाद्वारे करण्यात येणारा अवैध पाणीउपसा रोखण्याकरीता तात्काळ संबधित पाटबंधारे विभाग आधिकारी,कर्मचारी,गटविकास आधिकारी कार्यालयातील कर्मचारी, व महावितरणचे कर्मचारी यांची संयुक्त पथके सर्व तहसिलदार यांनी स्थापित करून अवैध पाणी उपस्यावर प्रतिबंध घालण्यात यावा आणि तसा अहवाल कार्यालयास सादर करण्यात यावा म्हटले आहे परंतु केवळ कागदोपत्रीच उपाययोजना राबविण्यात येत असून हितसंबंध जोपासत जिल्हाप्रशासनाची खोटा अहवाल सादर करून दिशाभूल करत आहेत. त्यामुळेच कठोर पणे उपाययोजना करण्यात यावी.

आष्टी तालुक्यातील हिवरा सज्जाचे तलाठयांकडून सामान्य जनतेची पिळवणूक ?

image editor output image 1824716135 1680032222264

आष्टी (अशोक गर्जे): तालुक्यातील हिवरा सज्जाचे तलाठी यांच्याकडून सामान्य जनतेची पिळवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर माहिती अशी की तलाठी सज्जा हिवरा येथील तलाठी कार्यालय १५ दिवसाला एकदा उघडते
सामान्य जनतेला नाहक त्रास होत असून प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही कार्यालय उघडते १२ वाजता याची दखल कोण घेणार कधी हा प्रश्न सुटणार ? सात बारा लागत असेल तर आष्टी ला जावे लागते. हिवरा ते आष्टी अंतर ३० किमी असून तलाठी यांची सामान्य जनतेची कामे करण्याची इच्छा नसल्याची दिसून येते अशा प्रशासकीय कामगारांवर काय कार्यवाही होणार ? अशी मागणी गावागावांतून होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

अनाधिकृत व आरोग्यास घातक असलेले धनगर जवळका येथील डांबरीकरण केंद्र व खडीक्रेशन बंद करा – शेतकऱ्यांची तहसीलदाराकडे मागणी

IMG 20230323 WA0065

पाटोदा ( प्रतिनिधी ): तालुक्यातील धनगर जवळका ग्रामपंचायत हद्दीत सर्वे क्र.५२अ शेजारी डांबरीकरण व खडीक्रेशन प्रकल्प उभारला जात असुन त्यापैकी डांबरीकर प्रकल्प सुरु करण्यात आला आहे सदरील प्रकल्पा मुळे मोठ्या प्रमाणात डांबरीचा आरोग्यस घातक असा काळा धूर निर्माण होत आहे.त्या धुराचे योग्य प्रकारे नियोजन न केल्या मुळे तसेच धूर सोडणाऱ्या उपकरणाची उंची कमी असल्या कारणाने शेजारील उभ्या असणाऱ्या ज्वारी गहू कांदा खरबूज सीताफळ पिकास व शेतकऱ्यांच्या आरोग्यास धुरामुळे धोका निर्माण झाला आहे. संबंधीत ठेकेदारास सर्वे.क्र.५२अ तलाठी कार्यालय धनगर जवळका येथील शेतकरी श्री.पांडुरंग वामन खाडे हे धुराच्या नियोजनाबाबत व होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती देण्यासाठी गेले असता संबंधीत ठेकेदारानी शेतकरी श्री.पांडुरंग वामन खाडे या शेतकऱ्यास त्याचे कुठलेही मत विचारात न घेता अरेरावीची भाषा वापरून तुम्ही पिक घेऊ नका जमीन विका आशा प्रकारे दम दिला या शेतकऱ्यचा मुलगा कोरोना काळात मयत झाला असुन त्यांच्यावर पूर्ण कुटुंबाचा (एक मुलगी,पत्नी ) यांचा उधरनिर्वाह या जमिनीवरच अवलंबून आहे.आशा वेळी सदरील ठेकेदाराने शेती योग्य कृषिक जमिनीत डांबरीकरण व सुरु होणाऱ्या खडीक्रेशन प्रकल्प उभारून सर्वे क्र.५२ अ मधील शेतकऱ्यांच्या पिकास धोका निर्माण केला आहे.तसेच जमीन कशाला पिकवता अशाप्रकारे बोलून तुम्ही माझे काहीच करू शकत नाहीत तुम्हाला कुठे जायचे तेथे जा असा दम दिला आहे. अगोदरच कोरोना मुळे मुलगा मयत झाल्याने शेतकऱ्यांचे कुटुंब हलाखीच्या परीस्थित जीवन जगत आहोत.त्यात पिकाचे नुकसान होत असल्याने जीवन कसे जगावे हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर आहे. शेतकऱ्यांनी खरबूज, सिताफळ या पिकाची लागवड करून दिवसरात्र मेहनत करून पिक घेतले आहे या कष्टाने पिकवलेल्या शेतीचे संबधीत ठेकेदारामुळे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उधरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण या प्रकरणाची योग्य दखल घेऊन मला न्याय द्याल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच तक्रारी मुळे संबधीत ठेकेदाराकडून माझ्या जिवितास धोका निर्माण होऊन शकतो. भविष्यात माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या जिवितास कुठल्याही प्रकारची इजा/शारीरिक हानी /वित्त हानी झाल्यास त्यास सर्वस्वी संबंधीत ठेकेदार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे सदर निवेदन शेतकरी पांडुरंग वामनराव खाडे यांनी १.मा.मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य २.मा.पालकमंत्री, जिल्हा बीड ३.मा.जिल्हाधिकारी साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय बीड ४.मा.उपविभागीय अधिकारी साहेब,(SDO) उपविभागीय कार्यालय पाटोदा ५.पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड ६.पोलीस स्टेशन,पाटोदा, ७.ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत,कार्यालय धनगर जवळका यांना दिले आहे.
तसेच या निवेदनावर बाबासाहेब ढेकळे,पांङूरंग गोरे ,उषा गोरे ,छञपती साबळे ,आकाश गर्जे,पोपट खाङे,नामदेव खाङे ,दादासाहेब खाङे यांच्या सह्या आहेत.

मी खङीक्रेशर ला परवाना दिला नाही तर मला गुत्तेदार यांनी उलट उत्तर दिले परवाना देऊ नका मी सिईओ कङून परवाना घेईल ―प्रगती खेङकर (ग्रामसेवक धनगरजवळका)

बीड: नियम धाब्यावर बसवणाऱ्या बिअरबार व वाईनशाॅपवर कारवाईसाठी प्रतिकात्मक दारूविक्री आंदोलन

IMG 20230201 WA0047

बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्य़ात बिअरबार आणि परमीट रूम आणि वाईन शाॅप परवान्यासाठी बंधनकारक राज्य उत्पादन शुल्क विभागांच्या नियम व अटींचे राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षक बीड यांच्याकडुन जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असून त्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.३० जानेवारी २०२३ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “प्रतिकात्मक दारूविक्री “आंदोलन करण्यात आले यावेळी बीड जिल्हाध्यक्ष शेख युनुस च-हाटकर,शहराध्यक्ष मुबीन शेख ,बीड तालुका सचिव मुश्ताक शेख,बलभीम उबाळे, सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड,बीड तालुकाध्यक्ष आप भिमराव कुटे,संजय सानप आदि सहभागी होते, तहसिलदार (महसुल)जि.का. बीड बनकर यांना निवेदन देण्यात आले.

बिअरबार आणि परमिट रूम आणि वाईन शाॅप परवान्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन काही अटी व शर्थी आधारे परवाने देण्यात येतात पण बीड जिल्ह्य़ात असे परवाने देताना नियम धाब्यावर बसवले जात आहेत दारू शरीरासाठी हानीकारक असते त्यामुळे तिची जाहिरात करता येत नाही परमिट रूम मध्ये रस्त्याच्या दर्शनी भागावर बाटल्या लावता येत नाहीत आणि त्यांच्या विक्रिचे दर ठरवलेले असताना ठीकाणी फलक लावलेले दिसुन येतात.अनेक ठिकाणी वाईन शाॅप रेट दारू मिळेल असे बोर्ड लावलेले असुन कायद्याने तसे करता येत नाही.
परवाना धारकाने अर्ज सादर केल्यानंतर उपनिरीक्षक दर्जाच्या खाली नसलेल्या नियुक्त आधिकारी तपासणी आणि पडताळणी अहवाल सादर करतात त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक पोलीस विभागाकडे परीसराची कायदा व सुव्यवस्था पडताळणीसाठी पत्र सादर करतात त्यानंतर अधिक्षक छाननी फ
पत्रकानुसार अहवालाची पडताळणी करतात आणि त्यांना काही आक्षेप नसल्यास राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक,पोलीस अधीक्षक,नगर पालिका मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक बोलावतात. त्यानंतर जिल्हाधिकारी चौकशी अहवालासह अर्ज समितीच्या विचारार्थ समितीसमोर ठेवतात आणि समितीच्या मान्यतेनंतर अर्ज मंजूर केला जातो. आदि संपुर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणे बंधनकारक असताना दुर्लक्ष करण्यात येत आहे.
तसेच दिवाळीच्या दरम्यान घाईघाईत जिल्हाप्रशासनाने १०० पेक्षा जास्त परवाने दिल्याची माहिती असुन परवाना देताना जागेची स्थळ पाहणी राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक बीड यांनी केली नसुन नियम व अटींची पुर्तता केल्याची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली.

पोलीस भरती मैदानी चाचणीला जाण्यासाठी महत्त्वाच्या सूचना

DOC 20230102 WA0001.

पोलीस भरती उमेदवारांसाठी सूचना

पोलीस भरतीचे ओळखपत्र ( Admit Card ) सोबत असल्याशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही. तसेच स्वतःची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड,पॅन कार्ड ची रंगीत फोटो ( Colour Xerox ) असलेले साक्षांकित प्रत उमेदवारांकडे असणे बंधनकारक असून सदरहू प्रती सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवाराने स्वतःच्या पोलीस भरतीचे ओळखपत्र ( Admit Card ) ची print ०२ प्रतीत व आवेदन अर्जाची print ०२ प्रत, स्वतःचे पासपोर्ट साईझ ( ५ सें.मी. x ४. ५ सें.मी. ) आकारायचे ऑनलाईन आवेदन अर्जावर सादर केलेले ६ फोटोसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
उमेदवाराने शारिरीक मोजमाप, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणी करिता दिलेल्या दिनांक व वेळेत उपस्थित राहावे. भरती प्रक्रियेदरम्यान शारिरीक मोजमाप / मैदानी चाचणी / लेखी चाचणी / कागदपत्र पडताळणी दिनांक व वेळी उमेदवार गैरहजर राहिल्यास, त्यांना भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. सदर चाचणीसाठी कोणत्याही कारणांसाठी किंवा परिस्थितीत दिनांक बदलून दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
शारिरीक मोजमाप अथवा मैदानी चाचणी यामध्ये काही तक्रार असल्यास संबंधित मैदानावर त्याच दिनांकाच्यावेळी प्रथम अपिल व व्दितीय अपिल करण्याची संधी आहे.
सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच दि.१५/१२/२०२२ किंवा त्यापूर्वीच्या दिनांकाची कागदपत्रे उमेदवाराने पडताळणीच्या दिनांकाच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक भरतीसाठी अर्हता, प्रमाणपत्र, सामाजिक तसेच समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी केलेल्या दाव्यांचा पुष्ठीसाठी विधीग्राह्य व जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांक १५/१२/२०२२ ( cut off date ) पर्यंत किंवा त्यापूर्वीची प्राप्त केलेली असणे अनिवार्य आहे. त्या नुसार आवश्य ती मूळ प्रमाणपत्रे, क्रिडा प्रमाणपत्र, पडताळणी अहवाल व अर्हता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे शारीरिक चाचणी, लेखी चाचणी व कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करू न शकल्यास उमेदवाराची उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल.
ऑनलाईन अर्जामध्ये आपण दावा केलेली माहिती ग्राहय धरून तात्पुरती निवड यादी करण्यात येईल, सदर निवड यादी कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहील. भरती निकषाची पूर्तता करत नसल्याचे आढळ्यास आपली उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल.
भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात उमेदवाराने गैरवर्तन / गैरकृत, भरतीसाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे निदर्शनास आल्यास उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल.
पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणतीही शारिरीक इजा / अपघात / नुकसान झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. त्याकरिता उमेदवाराने स्वतःची शारिरीक क्षमता / वैद्यकीय पात्रता विचारात घेऊन मैदानी चाचणीच्या प्रकारात सहभागी व्हावे व स्वतःची सर्वातोपरी काळजी घ्यावी.
उमेदवारांनी ऑन लाईन अर्ज भरताना दिलेला भ्रमणध्वनी (मोबाईल क्र.) व ई-मेल कृपया बदलू नये. भरतीबाबतच्या सूचना आपण नमूद केलेल्या भ्रमणध्वनी (मोबाईल क्र.) अथवा ई-मेल वर देण्यात येतील.प्रवेशपत्रावरील फोटो, उमेदवाराचे नाव व इतर तपशील सुस्पष्ट व वाचनीय राहण्याची काळजी घ्यावी व प्रवेशपत्र भरतीच्या अंतिम टप्प्यापर्यंत आवश्यक असल्यामुळे त्याचे जतन करावे.
प्रवेशपत्रा तील अर्जदाराची माहिती अर्जदाराने Online अर्जात भरलेल्या माहितीनुसार दिलेली असल्यामुळे सदरहू माहिती त्यांच्या मूळ प्रमाणपत्र / कागदपत्रांची अंतिम पडताळणीस अधीन राहील. प्रवेशपत्र प्राप्त झाले म्हणून उमेदवारास निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी. उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबतच्या सूचना / निकाल वेळोवेळी संकेतस्थळावर दिल्या जातील, त्याप्रमाणे उमेदवारांनी अद्यावत माहितीसाठी व सूचनांसाठी वेळोवेळी जाहिरातीत दर्शविलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
महिला उमेदवार :- ज्या महिला उमेदवार महिला आरक्षणाचा लाभ घेणार आहेत, अशा महिला उमेदवारांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र व खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांनी ‘फ’ विवरणपत्र शारीरिक चाचणीपुर्वी उपलब्धकरून देणे आवश्यक आहे. जर त्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अथवा ‘ फ ‘ विवरणपत्र उपलब्ध करून देत नसल्यास त्यांना महिला आरक्षणाचालाभ अनुज्ञेय ठरणार नाही.