सोयगाव, दि.१०: शिवसेना(उद्धव ठाकरे) सोयगाव विभाग प्रमुखपदी घोसला येथील ज्ञानेश्वर धोंडू युवरे यांची नियुक्ती पत्राद्वारे निवड करण्यात आली आहे.उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू राठोड यांच्या आदेशानुसार तालुका प्रमुख दिलीप मचे यांनी ही निवड केली आहे.सोयगावला नगरपंचायत निवडणुकांतर उद्धव ठाकरे शिवसेनेची पक्ष बांधणी जोरदार हाती घेण्यात आली असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक मध्ये यश मिळवण्यासाठी शिवसेना(उद्धव ठाकरे) कामाला लागली असून सोयगाव शहरात आणखी तीन बडे मासे उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची भाकीत तालुका प्रमुख दिलीप मचे यांनी सांगितले आहे. या निवडीबद्दल चंद्रास रोकडे, राजू गव्हाड,दीपक बागुल, दीपक रावळ कर आदींनी अभिनंदन केले आहे.