पाटोदा ( प्रतिनिधी ): तालुक्यातील धनगर जवळका ग्रामपंचायत हद्दीत सर्वे क्र.५२अ शेजारी डांबरीकरण व खडीक्रेशन प्रकल्प उभारला जात असुन त्यापैकी डांबरीकर प्रकल्प सुरु करण्यात आला आहे सदरील प्रकल्पा मुळे मोठ्या प्रमाणात डांबरीचा आरोग्यस घातक असा काळा धूर निर्माण होत आहे.त्या धुराचे योग्य प्रकारे नियोजन न केल्या मुळे तसेच धूर सोडणाऱ्या उपकरणाची उंची कमी असल्या कारणाने शेजारील उभ्या असणाऱ्या ज्वारी गहू कांदा खरबूज सीताफळ पिकास व शेतकऱ्यांच्या आरोग्यास धुरामुळे धोका निर्माण झाला आहे. संबंधीत ठेकेदारास सर्वे.क्र.५२अ तलाठी कार्यालय धनगर जवळका येथील शेतकरी श्री.पांडुरंग वामन खाडे हे धुराच्या नियोजनाबाबत व होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती देण्यासाठी गेले असता संबंधीत ठेकेदारानी शेतकरी श्री.पांडुरंग वामन खाडे या शेतकऱ्यास त्याचे कुठलेही मत विचारात न घेता अरेरावीची भाषा वापरून तुम्ही पिक घेऊ नका जमीन विका आशा प्रकारे दम दिला या शेतकऱ्यचा मुलगा कोरोना काळात मयत झाला असुन त्यांच्यावर पूर्ण कुटुंबाचा (एक मुलगी,पत्नी ) यांचा उधरनिर्वाह या जमिनीवरच अवलंबून आहे.आशा वेळी सदरील ठेकेदाराने शेती योग्य कृषिक जमिनीत डांबरीकरण व सुरु होणाऱ्या खडीक्रेशन प्रकल्प उभारून सर्वे क्र.५२ अ मधील शेतकऱ्यांच्या पिकास धोका निर्माण केला आहे.तसेच जमीन कशाला पिकवता अशाप्रकारे बोलून तुम्ही माझे काहीच करू शकत नाहीत तुम्हाला कुठे जायचे तेथे जा असा दम दिला आहे. अगोदरच कोरोना मुळे मुलगा मयत झाल्याने शेतकऱ्यांचे कुटुंब हलाखीच्या परीस्थित जीवन जगत आहोत.त्यात पिकाचे नुकसान होत असल्याने जीवन कसे जगावे हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर आहे. शेतकऱ्यांनी खरबूज, सिताफळ या पिकाची लागवड करून दिवसरात्र मेहनत करून पिक घेतले आहे या कष्टाने पिकवलेल्या शेतीचे संबधीत ठेकेदारामुळे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उधरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण या प्रकरणाची योग्य दखल घेऊन मला न्याय द्याल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच तक्रारी मुळे संबधीत ठेकेदाराकडून माझ्या जिवितास धोका निर्माण होऊन शकतो. भविष्यात माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या जिवितास कुठल्याही प्रकारची इजा/शारीरिक हानी /वित्त हानी झाल्यास त्यास सर्वस्वी संबंधीत ठेकेदार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे सदर निवेदन शेतकरी पांडुरंग वामनराव खाडे यांनी १.मा.मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य २.मा.पालकमंत्री, जिल्हा बीड ३.मा.जिल्हाधिकारी साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय बीड ४.मा.उपविभागीय अधिकारी साहेब,(SDO) उपविभागीय कार्यालय पाटोदा ५.पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड ६.पोलीस स्टेशन,पाटोदा, ७.ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत,कार्यालय धनगर जवळका यांना दिले आहे.
तसेच या निवेदनावर बाबासाहेब ढेकळे,पांङूरंग गोरे ,उषा गोरे ,छञपती साबळे ,आकाश गर्जे,पोपट खाङे,नामदेव खाङे ,दादासाहेब खाङे यांच्या सह्या आहेत.
मी खङीक्रेशर ला परवाना दिला नाही तर मला गुत्तेदार यांनी उलट उत्तर दिले परवाना देऊ नका मी सिईओ कङून परवाना घेईल ―प्रगती खेङकर (ग्रामसेवक धनगरजवळका)