बीड जिल्हा

बीड जिल्हा पूर्वीच्या हैद्राबाद राज्यातील मराठी भाषिकापैकी एक जिल्हा आहे. सन 1956 साली द्विभाषिक राज्याच्या स्थापनेच्या वेळी हा जिल्हा द्विभाषिक राज्याच्या मराठवाड्यात होता. सन 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर हा जिल्हा मराठी भाषिक राज्यात म्हणजे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट 1982 ला मराठवाडा प्रादेशिक विभागाचे व बीड जिल्हयाचे विभाजन करण्यात आले. त्यावेळी या जिल्हयातील अंबाजोगाई तहसीलमधील रेणापूर मंडळातील 43 गावे व 11 वाड्यांचा लातूर जिल्ह्यात समावेश करण्यात आला. बीड जिल्हा औरंगाबाद विभागाच्या पश्चिमेश मध्यभागी वसलेला आहे. बीड जिल्हा दख्खनच्या काळया थरांच्या दगडांच्या प्रदेशात वसलेला आहे. बालाघाटची पर्वतरांग ही जिल्हयातील प्रमुख पर्वतरांग असून ती पश्चिमेकडे अहमदनगर जिल्हयाच्या सीमेपासून पूर्वेला जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पसरली आहे. या पर्वत रांगांमळे जिल्हयाचे दोन भाग पडले आहेत. उत्तरेकडील सखल प्रदेश गंगथडी म्हणून ओळखला जातो आणि दुसरा उंचावरील प्रदेश घाट बालाघाट म्हणून ओळखला जातो.बीड जिल्ह्यात पाटोदा,आष्टी,शिरूर,गेवराई,बीड, माजलगाव, धारूर,परळी,अंबाजोगाई,वडवणी,केज ही तालुके आहेत.साप्ताहिक आठवडा विशेष प्रथमतः पाटोदा तालुक्यातुन सुरू करण्यात आला.नंतर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांना आपल्या न्यूजपोर्टल मार्फत प्रसिद्धी देण्याचे कार्य हाती घेण्यात आले.

बीड जिल्हासामाजिक

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

आठवडा विशेष|प्रतिनिधी अंबाजोगाई: रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीच्या वतीने दिनदर्शिका- 2019 चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी देवल कमिटीचे विश्वस्त कमलाकर चौसाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून राजू मोरे (अध्यक्ष, राजश्री शाहू पतसंस्था, अंबाजोगाई) हे होते.ना नफा...

1 107 108 109
Page 108 of 109