सालेवडगाव येथे कोव्हिड सेंटर उद्घाटन आ.बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते करण्यात आले

कडा:शेख सिराज―
आष्टी तालुक्यातील रामतीर्थ सालेवडगाव या ठिकाणी महादेव डोके यांच्या पुढाकाराने व मा.आ. आजबे काका यांच्या उपस्थितीत व श्याम सुंदर पुरी महाराज यांच्या हस्ते कोवीड सेंटरचा उद्घाटन करण्यात आले .भैरवनाथ विद्यालय सालेवडगाव येथे मा. आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ आणी रामतीर्थ सेवाभावी संस्था सालेवडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत कोव्हिड सेंटर चालू करण्यात आले अधिक माहिती अशी की दिवसेंदिवस कोरोना रूग्नांची वाढती संख्या यातच उपचार वेळेत न मिलाल्याने गोरगरिब नागरींकाचे बळी जात आहे दवाखान्यात बेड ऊपलब्ध होत नाहीत यातच कोरोना पेशंट दररोज वाढत आहे.ग्रामीण भागातिल नागरिंकाना यांचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात को कोवीड सेंटर उभारण्यात आले आहे ज्यांना लक्षण आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन आडमिट व्हावे. दुखणे अंगावर न काढता स्वताची काळजी घ्यावी असे आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी नागरिकांना आवाहन केले . मतदार संघात ज्या ज्या ठिकाणी नागरिकांची मागणी असं अशा ठिकाणी कोवीड सेंटर उभारण्यात येणार आले . उपस्थित वैद्यकीय अधिकारी नितीन मोरे, डॉक्टर शिवाजी राऊत, अंभोरा पोलिस स्टेशनचे एपीआय ज्ञानेश्वर कुकलारे साहेब, अण्णासाहेब चौधरी, कृषि भूषण बाबासाहेब पिसोरे, नाजिम शेख , पत्रकार अंकुश तळेकर, कासम शेख, अमर हजारे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.