पत्रकार आणि माध्यमातील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक राशन चे वाटप होणार ; उद्या पत्रकारांना मास्कचे वाटप– वैभव स्वामी यांची माहिती

बीड:आठवडा विशेष टीम― बीड शहरातील विविध वर्तपत्रामधील आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार तसेच कॅमेरामन,ऑफिस बॉय, ऑपरेटर,मशीन ऑपरेटर,पेपर विक्रेते,एजंट आणि पेपर लाईन करणारी मुले यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्या वतीने मोफत राशन लवकरच देण्यात येणार आहे. ज्या गरजूवंतांना राशनची खरी गरज आहे अशाच व्यक्तीने संपर्क साधावा असे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा शाखेने इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील गरजूवंतांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला आहे.माध्यमातील पत्रकार,प्रेस फोटोग्राफर,ऑपरेटर,ऑफिस बॉय,वसुली प्रतिनिधी, व्यवस्थापक,मशीन ऑपरेटर, पेपर विक्रेते एजंट आणि पेपर लाईन करणारी मुले या घटकांमधून ज्यांना राशनची खरी गरज आहे अशाच गरजूवंतांनी संपर्क साधावा आणि आपली नोंद पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ जाधव मोबाईल नंबर 98 81 42 42 86 या वर संपर्क करून दोन दिवसात नोंद करावी. यानंतर गरजूवंतांना घरपोच अत्यावश्यक राशन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी जाहिर केले आहे.

उद्या पत्रकारांना मास्कचे वाटप – वैभव स्वामी

शहरातील पत्रकार आणि प्रेस फोटोग्राफर यांना पत्रकार संघाच्या पुढाकारातून आणि पतंजली योग समितीच्या सौजन्याने मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या सूचनेवरून मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.तरी सर्व पत्रकार आणि प्रेस फोटोग्राफर यांनी अण्णाभाऊ साठे चौक,छत्रपती संकुल येथील पतंजली योग समितीच्या कार्यालयात उद्या गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी १२ या वेळेत येऊन मास्क घेऊन जावे अशी विनंती पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी केली आहे. पतंजली योग समितीच्या हेमाताई विभुते यांच्या पुढाकारातून आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील गरजवंतांना एक हजारापेक्षा अधिक मास्कचे वाटप करण्यात आलेले आहे.यापूर्वी देखील पत्रकारांना मास्क वाटप करण्यात आले होते.पत्रकार संघाच्या विनंतीवरून पुन्हा एकदा उद्या गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत अण्णाभाऊ साठे चौकातील छत्रपती संकुल मध्ये असलेल्या पतंजली कार्यालयात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमातील पत्रकार आणि प्रेस फोटोग्राफर यांच्यासाठी मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.तरी पत्रकार आणि प्रेस फोटोग्राफर यांनी ग्रुपने न येता स्वतंत्ररित्या येऊन मास्क घेऊन जावे असे आवाहन वैभव स्वामी यांनी केले आहे.