पंचायत समितीमधील काळा बाजार बंद करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या पक्षाच्या तालुका प्रमुखाला आली उपोषण करण्याची वेळ
पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा पंचायत समिती कार्यालयामध्ये सामान्य लोक कामे घेऊन गेले तर कामे होईना म्हणून विचारण्यासाठी पाटोदा शिवसेना तालुका प्रमुख लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी रोहयो कक्षात गेले असता पाटोदा पंचायत समिती मुजोर कक्ष अधिकारी वराट हे अरेरावीची भाषा वापरीत आहेत रोहयो सदस्य या नात्याने राहुल चौरे यांनी माहिती मागितली असता मला का विचारता असे उत्तर देत मला जर माहिती विचारली तर ३५३ ची केस करेन अशी धमकी वराट यांनी केली असा आरोप चौरे यांनी केला असून माझ्या सारख्या सत्तेतील तालुका प्रमुखाला जर अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य लोकांचे काय हाल होत असतील तसेच रोहयो समिती सदस्य नात्याने राहुल चौरे यांनी शेतकऱ्यांना विहीर मंजुर करण्यासाठी पाच ते दहा हजार रुपये कशाला लागतात आशी विचारना केली असता आम्हाला वरीष्ठांना व ऑडीट आणि झेरॉक्ससाठी लागतात असे वराट यांनी सांगितले असे शिवसेना तालुकाप्रमुख राहुल चौरे यांनी निवेदनात म्हटले असून या प्रकरणी हवे असल्यास पैसे देणारे लोक आपल्या समोर उभे करतो आशेही चौरे यांनी सांगितले असून ही बाब अतिषय गंभीर असून लोकशाहीला व प्रशासनाला घातक असून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम पाटोदा पंचायत समितीमध्ये होत असल्याने या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून या मुजोर अधिकारा-यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. तसेच कक्ष अधिकारी वराट हे गेली अनेक वर्ष एकाच जागी कसे आहेत प्रशासनाने यांची बदली का करत नाही यांच्या डोक्यावर कोणाचा हात आहे कक्ष अधिकारी वराट हे गरीब व सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करण्याचे काम करीत असल्याने वरिष्ठ अधिकारी गप का? प्रशासनामध्ये इतरांना वेगळा न्याय व वराट यांना वेगळा का यामुळे भ्रष्टाचार करण्यासाठीच शेतकऱ्यांना आरेरावीची भाषा बोलणार्या अधिकार्याची चौकशी करून तात्काळ बदली करावी पगार किती आणि त्याची प्रॉपर्टी किती यांची चौकशी करण्यात यावी नसता पाटोदा पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्यात येईल अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख तथा रोहयो समिती सदस्य राहुल चौरे यांनी रोहयो मंञी भुमरे, बीड जिल्हा अधिकारी, मुख्य अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या कडे केली आहे.