अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
राज्यातील पञकारांना 50 लाखांचे वीमा संरक्षणाचे कवच द्यावे यासह इतर मागण्या अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष लहू महादेव बनसोडे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे गुरूवार,दिनांक 24 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री यांना अप्पर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांचे मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मार्च-२०२० पासून संपुर्ण जगभरात कोरोना विषाणुजन्य आजाराने थैमान घातले असून त्यात अनेकांचे मृत्यु होत आहेत.महाराष्ट्र शासनाने अनेक विभागाच्या कर्मचारी यांना रूपये ५०.०० लक्ष विमा कवच दिले आहे.परंतू भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचा या कामात मोलाचा वाटा असताना घोषणा करून ही विमा कवच दिले नाही.म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना ५०.०० लक्ष रूपयांची मदत करण्यात यावी.पत्रकार विमा योजना तातडीने सुरू करावी.,कोरोनामुळे आजारी असलेल्या पत्रकारांना रूग्णालयात बेड व ऑक्सीजन , व्हेंटीलेटरची तात्काळ व्यवस्था करावी.पञकार संतोष पवार,पांडूरंग रायकर यासह अनेक पत्रकारांच्या मृत्युस जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.तरी निवेदनात नमूद मागण्यांचा सहानुभूतिपूर्वक दृष्टीकोणातून विचार करून आठ दिवसांच्या आत मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा याप्रश्नी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय,अंबाजोगाई यांच्या कार्यालयासमोर नाविलाजाने आमरण उपोषण करण्यात येईल.उपोषण काळातील संभाव्य परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष लहू बनसोडे यांनी दिला आहे.सदरील निवेदनाच्या प्रती नोंदणीकृत डाकपत्राने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक, बीड यांना पाठवण्यात आल्या आहेत.