पाटोदा: राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जयंतीनिमित्त पाटोद्यात सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध धार्मिक व समाज उपयोगी कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सन्मान सोहळा विविध स्पर्धा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तीन दिवस हा सोहळा चालणार आहे.या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हान देखील करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पाटोदा शहरात राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी देखील सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये 11 ऑगस्ट रोजी पशु व संवर्धन आयुक्त डॉ सागर डोईफोडे जम्मू-काश्मीर सेंद्रिय शेती तज्ञ सत्यजित हंगे व रेल्वे मंत्रालय दिल्लीचे सल्लागार धनराज गुट्टे यांचे सकाळी 11 ते 2 या वेळेत व्याख्यान होणार आहे राष्ट्रसंत भगवान बाबा गौरव पुरस्कार सोहळ्याचेही आयोजन याप्रसंगी करण्यात आले आहे.यंदाचे पुरस्कार सहारा अनाथालयाची संचालक संतोष गर्जे,प्रीती गर्जे,पसायदान प्रकल्पाचे गोवर्धन दराडे,पत्रकार सुरेश जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे.यासोबत 12 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता खुल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी सात ते नऊ च्या दरम्यान गायक सुभाष शेप यांच्या भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या प्रतिमेची पाटोदा शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक सकाळी 11 ते दुपारी दोनच्या दरम्यान निघणार आहे. तसेच सकाळी 11 ते 5 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे संध्याकाळी पाच ते सात या वेळेत निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. या जयंती उत्सव सोहळ्यात आयोजित सर्व कार्यक्रमा साठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
■ सन्मान कर्तुत्वाचा!
राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती उत्सव सोहळ्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तुत्वान असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे,यामध्ये पद्मश्री सय्यद शब्बीर,गोसेवक निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर,महंत राधाताई महाराज आईसाहेब,इन्फंट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे व सेंद्रिय शेती तज्ञ सत्यजित हंगे आदी मान्यवरांना सन्मानित केले जाणार आहे.
■ जयंती उत्सवाचे ठिकाण व आयोजक!
राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राष्ट्रसंत भगवान बाबा सार्वजनिक जयंती उत्सव समिती पाटोदा यांनी विविध उपक्रमाचा आयोजन करत असते यावेळी देखील सामाजिक उपक्रमातून जयंती साजरी करण्याचा निर्णय आयोजकांनी केला असून यावर्षी नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात तीन दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमातून मोठ्या उत्साहात जयंती साजरी होणार आहे.