बीड दि.०८ जुलै:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातुन आज २६२ जणांचे स्वॅब कोरोना कोविड-१९ RT-PCR चाचणीसाठी कोविड सेंटर ला पाठविण्यात आले होते त्यापैकी १७ जणांचे चाचणी केल्यानंतर स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह स्वरूपाचे आले आहेत.तर २३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आणि ०७ जणांचे अहवाल अनिर्णित (Inconclusive) स्वरूपाचे आहेत.
आज कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण (१७)―
तीन जण ३६ वर्षीय महिला, १५ व १३ वर्षीय पुरुष (एस.बी.आय.परळी कर्मचा-यांचे कुटुंबिय रा.शिक्षक कॉलनी, मोरेवाडी) अंबाजोगाई तालुक्यातील आहेत. सहा जण ४५ वर्षीय पुरुष (एसबीआय बँक कर्मचारी), परळी शहर ,३३ वर्षीय पुरुष (एसबीआय परळी कर्मचारी), परळी शहर ,७१ व ०७ वर्षीय पुरुष (एसबीआय कर्मचा-याचे कुटुंबीय), परळी शहर ,४६ वर्षीय पुरुष (एसबीआय बँकेचा ग्राहक),परळी शहर
२३ वर्षीय पुरुष (एसबीआय बँकेचा ग्राहक, रा.दादाहरी वडगाव) परळी तालुक्यातील आहेत. दोन जण २६ वर्षीय महिला ( ईस्लामपुरा गेवराई पॉझिटिव्ह सहवासीत ) , गेवराई शहर ,२८ वर्षीय पुरुष ( पुणे हुन आलेला रा.केकतपांगरी ) हे गेवराई तालुक्यातील आहेत. सहा जण ६८ वर्षीय पुरुष ( स्टेट बँक कॉलनी , परवाना नगर , बीड ) , बीड शहर ,४३ वर्षीय पुरुष ( मोमोनपुरा , मक्का चौक ) , बीड शहर ,३० वर्षीय पुरुष ( विद्यानगर पुर्व ) , बीड शहर ,८३ वर्षीय स्त्री ( गोविंदनगर , बीड ) बीड शहर ,५५ वर्षीय पुरुष ( साक्षाळपिंप्री ) , ३० वर्षीय पुरुष ( वंजारवाडी ) हे बीड तालुक्यातील आहेत.बीड तालुक्यातील ६ रुग्णांपैकी ३ रुग्ण हे बीड शहरातील मेगासर्वेतुन आढळलेले आहेत.अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.