सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध मागण्यासाठी शुक्रवारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर मागण्यांचे निवेदन सादर केले.निवेदनात विविध आठ मागण्या नमूद करण्यात आल्या आहे.
सोयगाव तालुका ग्रामपंचायत संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालायाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये किमान वेतन मिळण्यासाठी अडथळा निर्माण करणारा वसुली अन उत्पन्नाची अट निर्णय रद्द करण्यात यावा.शासनमान्य किमान वेतन व राहणीमान भत्ता पूर्णपणे मिळावा कालबाह्य ठरणारा जाचक लोकसंख्येचा आकृतिबंध रद्द करावा यासह विविध आठ मागण्यांचे निवेदन विस्तार अधिकारी साहेबराव शेळके यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील,संतोष बिऱ्हारे,पारस कंडारे आदींची उपस्थिती होती,यावेळी पंचायत समिती आवारात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.