परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―
तालुक्यातील वडगाव (दा) येथे एकजण कोरोना पॉझीटिव्ह आढळुन आल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी गावात संचारबंदी लागु करण्याचे आदेश दिल्यानंतर ग्रामसेवक अनिल हजारे व तलाठी विष्णू गित्ते यांनी आदेशाची अंमलबजावणी करत घराबाहेर पडणार्या नागरीकांना 500 रुपयांचा दंड आकारल्याने गावात कोरोना फैलावण्यापासुन बचाव होत आहे.
परळीच्या एसबीआय बॅंकेतील कर्मचारी पॉझीटिव्ह निघाल्यानंतर वडगाव येथील एकजण पॉझीटिव्ह निघाल्याने जिल्हाधिकार्यांनी गावात संचारबंदी लागु करण्याचे आदेश दिले. ग्रामसेवक अनिल हजारे, तलाठी विष्णू गित्ते व सरपंच बजरंग कुकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे यांनी गावात जनजागृती केली. यानंतरही काहीजण विनाकारण घराबाहेर फिरत होते.गावात दवंडी देवुन घरबाहेर पडणार्या ग्रामस्थावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितल्यानंतर गावातील लोकांनी विनाकारण घराबाहेर पडणे बंद केले. तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करत गावात येणारे रस्तेही बंद केले आहेत यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येत आहे.