अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

कोरोना संकटकाळात गरजूंना मदत ; घेतली जनतेच्या आरोग्याची काळजी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील
तरूण उद्योजक विनोद पोखरकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना विषाणु साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर संकटकाळात विविध माध्यमातून गरजूंना मदत केली.जनतेच्या आरोग्याची काळजी वाटत असल्याने त्यांनी शुक्रवार,दिनांक 10 जुलै रोजी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या परिसरात नागरिकांना हात धुण्यासाठी सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या परिसरात नागरिकांना हात धुण्यासाठी शुक्रवार,दिनांक 10 जुलै रोजी 2 सॅनिटायझर मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.या सुविधेचा प्रारंभ ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार,ज्येष्ठ पञकार रमाकांत पाटील,हॉटेल साई सुरभीचे संचालक विनोद पोखरकर,पञकार रणजित डांगे,मल्हारी जोगदंड आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.हॉटेल साई सुरभीचे संचालक विनोद पोखरकर यांनी वयाच्या 28 व्या वर्षी नोकरीच्या मागे न लागता आपला एक छानसा उद्योग सुरू करून तो यशस्वी करणे शक्य आहे,हे स्वप्नवत वाटत असेलही पण,ही किमया विनोद पोखरकर यांनी करून दाखवली आहे.केवळ 11 वर्षांत उद्योगात जम बसवता येऊ शकते,हे त्यांनी दाखवून दिले आहे.”साई सुरभी” या नांवाचा हॉटेल उद्योग त्यांनी सुरू केला आहे.या सोबतच अत्यंत दर्जेदार,चविष्ट आस्वाद देणारे हॉटेल साई सुरभी हा “चाट व फास्टफुड विक्रीचा” नवा उद्योग त्यांनी अंबाजोगाई शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू करून केवळ 5 वर्षांत त्यात आपला दबदबा निर्माण केला आहे.विनोद पोखरकर हे मुळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील.आई गृहिणी आणि वडील सिद्रामआप्पा पोखरकर हे अंबाजोगाई नगरपरिषदेत कार्यरत होते.नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत.विनोद यांचे प्राथमिक,माध्यमिक
शिक्षण अंबाजोगाईत तर पदव्युत्तर शिक्षण औरंगाबाद येथे झाले.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना स्वतःचा उद्योग थाटावा असे वाटले. शोध सुरू केला.यानुसार त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला.घराची जबाबदारी सांभाळत आर्थिक हातभार लावला.यासाठी भाऊ प्रमोद यांचे सहकार्याने कुटुंबाची आर्थिक बाजू पक्की केली.आपल्या व्यवसायात विनोद पोखरकर यांनी सध्या 30 जणांना रोजगार दिला.सुरूवातीला मिळालेला पैसा व्यवसायात गुंतवला.आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसमुग्री, मनुष्यबळाचे कौशल्य,शिक्षण यावर त्यांचा आजही भर आहे.भविष्यात व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.घरात कुठेही उद्योजकतेची पाळेमुळे रूजलेली नसताना केवळ काही तरी वेगळे करायचे आणि त्यात आपला दबदबा निर्माण करायचा या हेतूने झपाटलेल्या विनोद यांनी आधी पञकारीतेचे शिक्षण ही घेतले आहे.नोकरीतील तोच तो पणा नको म्हणून वयाच्या 34 व्या वर्षीही ‘कॅलक्युलेटिव्ह रिस्क’ घेत ते उद्योजक म्हणून यशस्वी ठरले आहेत.व्यवसाय उभारताना प्रत्येक बाबतीत व्यावसायिक आणि अनुभव असलेल्यांशी झालेले शेअरिंग,मार्गदर्शन मोलाचे सहकार्य देऊन गेले.ते म्हणाले,पत्नीने दिलेली साथ कायम लक्षात राहणारी आहे.आधी नोकरी करावी,अनुभव घ्यावा आणि मगच व्यवसायात यावे कारण,त्याशिवाय अनुभवसिद्धता येत नाही.स्वतः नियोजन,ऑर्डर मिळवण्याच्या कामांसह अकाउंट व फायनान्सचे काम करतो.क्वालिटी,क्वांटिटी आणि पंक्चुअॅलिटी हे यशाचे गमक आहे.उद्योग सुरू करणे ही कसरत असून मिळणारा उद्योजकीय निर्मितीचा आनंद-समाधान वेगळेच आहे.जे कुठल्याही नोकरीत मिळू शकत नाही.नैराश्यावर कायम मात करत आलो.ती मात करताना मित्रमंडळीचा सहभाग मोठा होता.आज व्यवसाय वाढला.व्याप वाढला.त्यामुळे विनोद यांच्या व्यवसायाची भरभराट झाली.व्यवसाय वाढला.एकापासून आज अंबाजोगाईत चार शाखा आहेत.यातून मग सामाजिक प्रगती साधली गेली.आज ते दिवसाला 10 ते 16 तास अविश्रांत काम करतात.आज हे सुखाचे दिवस अनुभवताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले.पण,त्यांना न घाबरता त्यांनी सकारात्मक निर्णय घेतले.आलेल्या संकटांचा सामना करण्याची तयारी ठेवणे आवश्यक असते.ही संकटे आपल्याला भरपूर शिकवून जातात असे ते आवर्जून नोंदवतात.कुशल मनुष्यबळ आणि इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.शिवसेनेचे नेते माजी मंञी जयदत्तआण्णा क्षीरसागर समर्थक म्हणून विनोद पोखरकर हे सर्वञ ओळखले जातात.लॉकडाऊन काळामध्ये अनेक सामाजिक उपक्रमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.गरजूंना मोफत जेवण,अन्नधान्याचे कीट,मास्क,सॅनिटायझर वाटप,सॅनिटायझर फवारणी ही केली.तसेच लॉकडाऊन काळात हिंगोली जिल्ह्यातील मजुर हे अंबाजोगाई व परळी तालुक्याच्या सिमेवर जंगलात अडकून पडले होते त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले.फेसबुकद्वारे कोरोना विषयक जनजागृती करून सुरक्षित कसे राहता येईल हे सांगितले.आज सर्वांनी मिळून कोरोनाला हरवण्यासाठी एकत्र यायला हवे.अंबाजोगाई नगरपरिषद परिसरामध्ये दररोज शेकडो लोक ये-जा करतात.तसेच कर्मचारी यांच्यासाठी 2 सॅनिटीझर मशीन सुरू करून यामुळे रोज शेकडो लोकांचा फायदा होवून ते सुरक्षित राहतील हा विचार हॉटेल साई सुरभीच्या माध्यमातून पुढे आणला आहे.

स्वत:कडील कौशल्य शोधा

उद्योगात पाऊल ठेवण्याआधी सर्वप्रथम स्वत:कडील कौशल्याचा शोध महत्त्वाचा आहे.त्यानंतर उपलब्ध भांडवल,कर्ज,जागा, उत्पादनाला बाजारात मिळणारा प्रतिसाद,कच्चा माल,तांत्रिक कौशल्य,मार्केटिंग याचाही विचार करावा असा सल्ला ते
तरूणांना देतात.स्टार्टअप,मेक इन ‌इंडिया आणि बँकांच्या उद्योग वाढीसाठी असलेल्या योजनांचा फायदा घ्यावा असे नवतरूणांना व बेरोजगारांना ते आवर्जून सांगतात.पॅशन आणि सातत्याने मेहनत करण्याची तयारी असेल,तर उद्योजक सहज होता येते,असे ते सांगतात.जिद्द,मेहनत व चिकाटीच्या जोरावरच उद्योगात यशस्वी होता येते. सतत काहीतरी नवे करण्याचा ध्यास असावा.मेहनतीची तयारी ठेवावी.कितीही संकटे आली तरी हार मानू नये.मग यश येतेच असा ठाम विश्वास उद्योजक विनोद पोखरकर यांनी व्यक्त केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button