पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीसामाजिक

कॉमेडियन सौरव घोष यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा पाटोदा शिवप्रेमींचे निवेदन

...तर तुमची कायमची कॉमेडी होईल–गणेश कवडे

पाटोदा:शेख महेशर― मुंबई येथील एका कार्यक्रमांमध्ये तथाकथित कॉमेडियन अग्रिमा जोशुआ व आयोजक सौरव घोष यांच्या वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपमानस्पद उद्धागार काढून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. असे आशया निवेदन पाटोदा तालुक्यातील शिवप्रेमी कडुन पाटोदा तहसील कार्यालयाला देण्यात आले. या वेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे मुंबई अरबी समुद्रात त्यांचे स्मारक करावे म्हणून पूर्ण देशातून शिवप्रेमी झटत होते. आणि त्या विषयी गरज नसताना टिंगल-टवाळी उडविण्याचे काम अग्रिमा जोषुवा यांनी केले त्यांच्या वर तात्काळ गुन्हा दाखल करावा आमच्या महापुरुषाबद्दल कसल्या ही प्रकारचा अपमान खपून घेतला जाणार नाही, असा इशारा कॉंग्रेस तालुका अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिला. या वेळी निवेदन मध्ये अग्रिमा म्हणाली की शिवाजी या पुतळ्या बाबत अधिक माहिती जाण्यासाठी मी गुगलवर इंटरनेट सोर्स वर गेली तर कोणी तरी निबंध लिहिला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल दुसर्‍या एकाला वाटलं काही तरी क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट आहे तो म्हणाला याला जीपीएस ट्रॅकर सुद्धा असणार आहे शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रात येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद या वर नजर ठेवेल तर तिसरा व्यक्ती येऊन सांगतो शिवाजी नाही तर शिवाजी महाराज मना बस मी त्यालाच फॉलो केलं अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांची हेटाळणी केली असून त्या मुळे शिवप्रेमी च्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्या मुळे तात्काळ संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी विनंती केली आहे निवेदन देताना काँग्रेस युवा नेते उमर चाऊस, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष रामदास भाकरे, राहुल बामदळे, युवराज जाधव, योगेश ढवळे, बापू नवले, आरसूळ भैय्या, विलास जावळे, नितीन येवले, इत्यादी सह शिवप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.