औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सोयगाव तालुक्याच्या संचारबंदीच्या शिथिलतेत पुन्हा बंधने ,सोयगाव पोलीस रस्त्यावर

सोयगाव दि.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता आकडा पाहून याचा धसका सोयगाव प्रशासनाने घेतला असून सोमवार पासून संचारबंदीत घालण्यात आलेल्या शिथीलतेत पुन्हा कडक बंधने घालण्यात येवून सोमवारी संचार बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी सोयगाव पोलीस पुन्हा रस्त्यावर उतरली होती.
जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विषाणू घातक असल्याचा अहवाल प्रयोग शाळेने दिल्यावरून तालुका प्रशासनाने धसका घेतला आहे.औरंगाबाद पेक्षा जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा विषाणू घातक ठरत असून जळगाव मधील मृत्यूदरात मोठी वाढ झाल्याने सोयगावच्या सीमेवरील असलेल्या जळगाव जिल्ह्यातील गावांमध्ये तालुक्यातील नागरिकांनी पवेश न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येवून सोयगाव तालुक्यातील संचारबंदीतील शिथिलता काहीअंशी उठविण्यात आली आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात पुनः कडक संचारबंदीसाठी पोलिसांनी पावले उचलली आहे.सोमवारी सोयगाव तालुक्याच्या गावात पुन्हा पोलिसांनी फेरफटका घालून विनाकारण फिरणाऱ्यांना पुन्हा पोलिसांनी झटका दाखवून घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांचेसह पथक रस्त्यावर तालुकाभर भटकंती करून विनामास्क आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना घरातच बसण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    आज सोयगाव बंदचे आवाहन-

    सोयगाव नगरपंचायतीच्या वतीने मंगळवारी सोयगाव बंद करण्याचे आवाहन करून मंगळवारी सोयगाव शहरात पहाटे सात ते रात्री नऊ पर्यंत शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे.त्यामुळे कोरोना संसार्गात नियंत्रणात असलेल्या सोयगाव शहराला पुनः कडक लॉकडाऊन ला सामोरे जावे लागणार आहे.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.