कोरोना विषाणू - Covid 19परळी तालुकाप्रशासकीयबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

महत्त्वाचे: रात्री उशीरा येणार बीड जिल्ह्यातील कोरोनाचे प्रलंबित अहवाल

बीड दि.13:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या 296 प्रलंबित स्वॅबचे अहवाल आज रात्री उशीरा प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. यात परळीतील रविवारच्या प्रलंबित 128 नमुन्यांसह सोमवारी पाठविण्यात आलेल्या 168 स्वॅबचा समावेश आहे. बीडमधून सर्वाधिक 104 स्वॅब पाठविण्यात आले आहेत. रात्री उशीरापर्यंत हे सर्व अहवाल प्राप्त होतील अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.