औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

CoronaVirus औरंगाबाद जिल्ह्यात आज 251 जण कोरोना पॉझिटिव्ह ,एकूण 3346 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात 5355 कोरोनामुक्त, 3346 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 14:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज 126 जणांना (मनपा 100, ग्रामीण 26) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 5355 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 251 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 117, ग्रामीण 134) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9065 झाली आहे. आजपर्यंत एकूण 364 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3346 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळनंतर 93 रुग्णांची वाढ झाली आहे.
यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत 93 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंटवर 38 आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 55 रुग्ण आढळलेले आहेत. सायंकाळनंतर आढळलेल्या या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा हद्दीतील रुग्ण : (73)

नेहरू नगर (4), भवानी नगर (4), मयूर नगर (17), शिवाजी नगर (2), नक्षत्रवाडी (6), एसबीआय सिडको (3), अमृत साई प्लाजा (6), शांती निकेतन (9), समता नगर (7), औरंगाबाद (2), सादातनगर (1), टीव्ही सेंटर (1), एन तीन (2), एन तेरा (1), कांचनवाडी (5), इटखेडा (3)

ग्रामीण भागातील रुग्ण (20)

कुंभेफळ (1), बाळापूर (2), सावंगी (2), सिडको महानगर (7), बजाज नगर (5), तिसगाव (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत औरंगपुऱ्यातील 68 वर्षीय स्त्री, भाग्य नगरातील 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.