आष्टी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

नगरपंचायतने तयार केलेला बेकायदेशीर विकास आराखडा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची नगररचनाकार व नगरपंचायत आष्टी यांना नोटीस ,भिमराव धोंडेंच्या निवेदनाची दखल

माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आराखडा विषयी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दखल

आष्टी:आठवडा विशेष टीम― आष्टी नगरपंचायत च्या वतीने आष्टी शहरांमध्ये आष्टी शहर विकासच्या नावाखाली आष्टी शहरातील चारही बाजूच्या रस्त्यांची कामे, नाल्यांची कामे ,पुलाचे कामे काही ठिकाणी सुरू आहेत तर काही रस्ते तीन-चार महिने होऊनही जसेच्या तसे आहेत. या होत असलेल्या कामाला योग्य दिशा नसल्याने,व शहरातील अनेक शासकीय जागा त्याचबरोबर धर्मस्थळ ,स्मशानभुमी ,कबरस्थान यांच्या जागा नगरपंचायत आरक्षित करू इच्छित असल्याचे दिसून येत असल्याने आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे माजी आ. भीमराव धोंडे यांनी याविषयी जिल्हाधिकारी बीड यांच्याशी सविस्तर चर्चा करून जिल्हाधिकारी यांनी योग्य निर्णय घ्यावा असे लेखी पत्र दिल्याने त्यांच्या या पत्राची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन बेकायदेशीर विकास आराखडा रद्द करावा अशी नोटीस सहाय्यक नगर रचनाकार सहाय्यक संचालक नगर रचना कार्यालय शाखा बीड व मुख्याधिकारी नगरपंचायत यांना दिले आहे .
या दिलेल्या नोटीसमध्ये नियोजित विकास आराखडा तयार करण्यापूर्वी मराठी भाषेत जाहीर प्रसिद्धी केलेली नाही नियमाप्रमाणे मराठी भाषेत जाहीर करावे असा नियम असल्याने तसे न करता इंग्रजीत भाषेत प्रसिद्ध केल्याने ते बेकायदेशीर आहे. प्राथमिक स्तरावरील आक्षेप बाबत अनेक आक्षे्प धारक असताना त्यांना सुनावणीच्या अगोदर नोटिसा दिलेल्या नाहीत .आष्टी शहरांमध्ये सरकारी जमिनी व जागा असून त्यामध्ये शासकीय कार्यालये, शासकीय निवासस्थाने ,मंदिर ,दर्गा कब्रस्तान ,स्माशानभुमी ,आठवडी बाजार तळ आधी सार्वजनिक ठिकाणे आहेत . सर्व ठिकाणे निजाम शासनापासून अस्तित्वात आहेत त्यामुळे विकास आराखड्यात फेरबदल करण्याचा अधिकार नगरपंचायत, नगर रचनाकार यांना नाही व त्यामध्ये फेरबदल करू नये हा भावनेचा व श्रद्धेचा प्रश्न आहे .आष्टी शहरात यापूर्वी नगरपालिका अस्तित्वात होती त्या वेळेसही विकास आराखडा तयार झालेला होता .व तो आराखडा नगर रचनाकार कार्यालय बीड यांच्याकडे उपलब्ध आहे .त्या वेळेस ही शासकीय वास्तूंचे व धार्मिक स्थळांचे अस्तित्व अबाधित होते .आष्टी शहरातील नगरपालिकेचे ग्रामपंचायत मध्ये रुपांतर करण्यात आले त्यामुळे त्या विकास आराखड्याची अंमलबजावणी झालेली नाही. सध्या ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये झालेले आहे. अआष्टी शहरालगत अनेक देवस्थाने जमिनी आहेत त्यामध्ये ढोर गल्ली, मज्जिद इनाम ,रामचंद्र देवस्थान ,दर्गा बुखारी मज्जिद व इतर अनेक हिंदू देवस्थाने अशा अनेक हिंदू-मुस्लिम देवस्थान जमिनी आहेत. त्या जमिनी नगरपंचायत भूखंड हडपण्यासाठी विकासाच्या नावाखाली आरक्षण टाकीत आहे यावर आरक्षण टाकू नये .आष्टी सर्वे नंबर 917, 918 ,919 ,920, 921 या सरकारी जमिनी शहराच्या मध्यभागी आहेत .त्यामध्ये ईदगाह, जि प माध्यमिक शाळा, पोलीस स्टेशन, शासकीय निवासस्थाने ,शासकीय धान्य कोठारे , जि प कन्या शाळा ,पोलीस कॉलनी, वन विभाग ,भूमी अभिलेख कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र ,नगरपंचायत कार्यालय, जि प उर्दू शाळा, ट्रेझरी ऑफिस ,शनिमंदिर पठाण शहावली दर्गा व कबरस्थान ,918 उद्यान, वैद्यकीय अधिकारी निवास्थान, न्यायालय ,जुने तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक यांचे कार्यालय, तलाठी कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय, शासकीय पशुवैद्यकीय चिकित्सक कार्यालय ,पोस्ट ऑफिस व चंद्रशहावली दर्गा. सर्वे नंबर 919 आठवडे बाजार तळ, महावितरण कंपनी कार्यालय व तेतीस केवी सबस्टेशन या जमिनीमध्ये शिल्लक राहिलेल्या नवीन शासकीय कार्यालयांना जागेची गरज असताना त्यामध्ये खाजगीरित्या नगरसेवक, पंचायतीने आरसीसी बांधकाम सुरू करून अतिक्रमण सुरू केलेले आहेत. त्यामुळे यावर नव्याने आरक्षण टाकू नये प्रारूप विकास आराखड्यात आष्टी शहरातील रस्ते नऊ मीटर, बारा मीटर ,15 मीटर करण्यात आलेले आहेत. परंतु अआष्टी शहराची लोकसंख्या विचारात घेता फार मोठे रस्त्याची आवश्यकता नाही. त्यामुळे नऊ मीटर रस्ते ठेवावेत सदर विकास आराखडा तयार करताना मूळनिवासी नागरिकांचा विचार केलेला नाही .त्यांना विश्वासात घेतलेले नाही .याकरिता सदर विकास आराखडा रद्द करण्यात यावा. याकरिता माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचे पृृष्टांकणानुसार उपरोक्त मुद्द्याचे अनुषंगाने मुद्देसूद स्वयंस्पष्ट व अनियमित असेल तर ती स्वयं स्पष्ट दिसेल असा अहवाल तातडीने तीन दिवसात या कार्यालयास सादर करावा. प्रकरण माननीय लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी महोदय संदर्भ असल्याने विलंब टाळावा असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा प्रशासन अधिकारी नगर परिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी आष्टी नगरपंचायत चे मुख्य अधिकारी यांना दिले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.