अकोला जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

अकोला: रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मध्ये 46 नवे कोरोना पॉझिटीव्ह

अकोला,दि.16:(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्हयात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 467 चाचण्यामध्ये 46 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.

आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे अकोट येथे 57 चाचण्या झाला त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे 20 जणांच्या होवून एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. बाळापूर येथे 110चाचण्या झाल्या तेथेही एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. पातूर येथे 218 चाचण्या झाल्या त्यात 41 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाशिटाकळी येथे 62 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 467 चाचण्यांमध्ये 46 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आजअखेर रॅपिड ॲन्टीजन टेस्टव्दारे 67 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.