औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

औरंगाबाद जिल्ह्यात आज ३३८ जण कोरोना पॉझिटिव्ह | Today 338 Covid19 cases reported in Aurangabad District

जिल्ह्यात 5861 कोरोनामुक्त, 3836 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दि.१७:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज 225 जणांना (मनपा 156, ग्रामीण 69) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 5861 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 338 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 248, ग्रामीण 90 ) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10,082 झाली आहे. आजपर्यंत एकूण 385 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3836 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 250 रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत 174 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंटवरील 35 आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 91, ग्रामीण भागात 48 रुग्ण आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
*मनपा हद्दीतील रुग्ण (74)*
रायगड नगर (4), भीम नगर (2), पटेल नगर (2), बीड बायपास (2), चिकलठाणा (1), सातारा परिसर (1), अन्य (1), पैठण गेट (1), दर्गा रोड (1), बन्सीलाल नगर (1), सहकार नगर (1), कोतवालपुरा (1), एन सहा सिडको (1), गुलमंडी (4),एन तीन सिडको (2), एन चार सिडको (4), पवन नगर (6), एन तेरा (1), टीव्ही सेंटर (8), खोकडपुरा (4), पारिजात नगर (1), राम नगर (4), न्याय नगर (1), ज्योती नगर (1), किल्लेअर्क (4), बजाज नगर (1), प्रथमेश नगर (1), ठाकरे नगर (2), जुना बाजार (1),देवळाई (1), विष्णू नगर (2), अल्तमश कॉलनी (2), नारेगाव (1), आयोध्या नगर (1),रोजाबाग (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1) अन्य (1)
*ग्रामीण भागातील रुग्ण (50)*
जाकेर हुसेन नगर, सिल्लोड (1), रांजणगाव (1), गंगापूर (38), खुलताबाद (2), सिल्लोड (8)
*सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (35)*
पडेगाव (2), रांजणगाव (2), बजाजनगर (1), छावणी (1), वाळूज (6), वडगाव (2), शिवाजी नगर (4), गंगापूर (1), एन नऊ (1), जाधववाडी (2), पिसादेवी (4), चितेगाव (2), कन्नड (4), चितेगाव (2), मुकुंदवाडी (1)
*मोबाईल स्वॅब कलेक्शन (टास्क फोर्स) (91)*
पद्मपुरा (3), रेल्वे स्टेशन (1), सारा वैभव, हर्सुल (5), बेगमपुरा (8), विद्यापीठ गेट (3), भवानी नगर (1), आयोध्या नगर (6), संभाजी कॉलनी (6), दत्त नगर, नक्षत्रवाडी (1), पीर बाजार (2), एन नऊ शिवनेरी कॉलनी (27), राम नगर (11), हनुमान नगर (7), म्हाडा कॉलनी (2) हर्ष नगर (7), एन चार सिडको (1)
*आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू*
घाटीत छावणीतील 61 वर्षीय पुरूष, हनुमान नगरातील 45 वर्षीय स्त्री, संसार नगरातील 60 वर्षीय स्त्री, आदित्य नगरातील 54 वर्षीय पुरूष, विविध खासगी रुग्णालयात मौलाना आझाद चौकातील 73 वर्षीय पुरूष, फाजलपुऱ्यातील 75 वर्षीय पुरूष, अजिंठ्यातील देशमुख गल्लीतील 72 वर्षीय पुरूष, शाहिस्ता कॉलनीतील 76 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.