राज्यात दि. १ ते १९ जुलैपर्यंत १८ लाख ५६ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप – मंत्री छगन भुजबळ

Last Updated by संपादक

मुंबई दि. 20.  राज्यात दि. 1 जुलै ते दि . 19 जुलैपर्यंत 870 शिवभोजन केंद्रातून पाच  रूपये प्रति थाळी याप्रमाणे 18 लाख 56 हजार 393 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यातआले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात  गरीब व गरजूंना  एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257,

मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 18 लाख 56 हजार 393 असे एकूण  दि.  1 एप्रिल  ते  दि . 19 जुलै या कालावधीत 1 कोटी  8 लाख 35 हजार 922 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या  आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.