अकोला जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

अकोला' १८५ अहवाल प्राप्त , १२ पॉझिटीव्ह ,२५ डिस्चार्ज

अकोला,दि.२१:आठवडा विशेष टीम― आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १८५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १७३ अहवाल निगेटीव्ह तर १२ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या २१८४(२०३१+१५३) झाली आहे. आज दिवसभरात २५ रुग्ण बरे झाले.आता ३०१ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १६८४३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १६३५४, फेरतपासणीचे १६१ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३२८ नमुने होते. आजपर्यंत एकूण १६७६८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १४७३७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २१८४(२०३१+१५३) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज १२ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळीच १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व सात पुरुष आहेत. त्यातील तीन जण हे बारगणपुरा अकोट येथील, तीन जण बोरगाव मंजू येथील, दोन जण रामनगर, तर उर्वरीत अकोली जहागीर अकोट, जीएमसी, खैर मोहम्मद प्लॉट व जिल्हा कारागृह येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी प्राप्त ७१ अहवालांत एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्या व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  २५ जणांना डिस्चार्ज

  दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून नऊ जणांना,कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जणांना, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन जणांना , ओझोन हॉस्पिटल येथून एका जणास तर हॉटेल रेजेन्सी येथून पाच जणांना अशा एकूण २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून देण्यात आली आहे.

  ३०१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

  आजपर्यंत एकूणपॉझिटीव्ह अहवालांची संख्या २१८४(२०३१+१५३) आहे. त्यातील १०४ जण (एक आत्महत्या व १०३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची १७७९ संख्या आहे. तर सद्यस्थितीत ३०१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.