ब्रेकिंग न्युज

औरंगाबाद: सोयगावला पीकविम्याची जनजागृती

सोयगाव,दि.२१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
खरिपाच्या पिकविम्याबाबत मंगळवारी सोयगाव शहरात चित्र रथाद्वारे जनजागृती करण्यात आली होती.खरीप पीकांचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
खरीप पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.त्या आधीच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा पीक विमा काढावा असे आवाहन महसूल विभागाने चित्र रथ फिरवून केले. कोरोना मुळे गर्दी न करता सामाजिक अंतर पाळून शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा असेही जनजागृती द्वारे सांगण्यात आले होते.यावेळी ,जिल्हा समन्वयक रामनाथ भिंगारे,आपलें सरकार सेवा केंद्र संचालक दीपक फुसे, तालुका प्रतिनिधी निरंजन जाधव, ऍग्रीकल्चर इन्शोरंन्स कंपनी तालुका प्रतिनिधी सुनिल काळे,अनिल पवार,संजय नावकर, पोतदार मॅडम, आदींसह शेतकरी हजर होते.2020-21, 2021-22, 2022-23 या तीन वर्षासाठी खरीप व रब्बी पिकांचे विमा प्रस्ताव स्वीकारणे साठी एच डी एफ सी एर्गो या विमा कंपनीची शासनाने निवड केलेली आहे. खरीप हंगामामध्ये खरीप ज्वारी,बाजरी, मका, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, खरीप कांदा या पिकांचा अधिसूचित महसूल मंडळामध्ये पीक विमा स्वीकारला जाणार आहे.
छायाचित्रओळ-पीक विमा कंपनीने प्रचार प्रसिध्दी साठी तयार केलेल्या रथाला तहसीलदार प्रवीण पांडे व नायब तहसीलदार एम शेख साहेब यांचे हस्ते झेंडा दाखवण्यात आला.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.