प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

२० लाख ४३ हजार ८६२ शिवभोजन थाळ्यांचे वाटप

मुंबई, दि. २२ : राज्यात दि. १ जुलै ते २१ जुलैपर्यंत ८७१ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे २० लाख ४३ हजार ८६२ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले
असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ०४०, जून महिन्यात ३० लाख ९६ हजार २३२, जुलै मध्ये आतापर्यंत २० लाख ४३ हजार ८६२ आणि असे एकूण दि. १ एप्रिल ते दि. २१ जुलै या कालावधीत १ कोटी १० लाख २३ हजार ३९१ शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.