Last Updated by संपादक
नागपूर, दि. 22 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज मुंबईहून विशेष विमानाने दुपारी 12 वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले.
विमानतळावर राज्यपालांचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, नागपूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींंद्र ठाकरे, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती श्रीमती शीतल तेली-उगले, पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला यांनी स्वागत केले. विमानतळावरील स्वागताचा स्वीकार करुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राजभवनकडे रवाना झाले.