प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

सर्वांच्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत

अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाल्याची प्रतिक्रिया

मुंबई दि. २२ : आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झालाच, शिवाय महाराष्ट्रासाठी अधिक समर्पित होऊन काम करण्याचं बळ मिळालं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तं शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी आज वाढदिवस साजरा केला नाही. मात्र, दूरध्वनीद्वारे तसेच डिजिटल माध्यमातून आलेल्या शुभेच्छांचा त्यांनी आवर्जून स्वीकार केला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या सर्वांच्या सदिच्छा माझ्यासाठी मोलाच्या असून वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात या सदिच्छांनी मला नेहमीच बळ दिलं आहे. या सदिच्छा कायम माझ्यासोबत असतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभार मानताना राज्यातील जनतेनं कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू मार्गदर्शक सूचना, आदेश, नियमांचं काटेकोर पालन करुन नागरिकांनी स्वत:च्या, कुटुंबाच्या तसंच सार्वजनिक आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहनही केलं आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक मान्यवरांनी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी, तसेच सर्वसामान्य जनतेनंही प्रसारमाध्यमांमध्ये, समाजमाध्यमांमध्ये लेख, अनुभव लिहून उपमुख्यमंत्र्यांबद्दल आदर, स्नेह, आपुलकी व्यक्त केली आहे. या सर्वांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. वाढदिवसानिमित्ताने आरोग्य शिबिरांचे आयोजन, वृक्षारोपण कार्यक्रम, गरजूंना मदतीसारखे सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल आनंद व्यक्त करुन उपमुख्यमंत्र्यांनी या सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.