मका खरेदी केंद्र सुरू ठेवण्यास मुभा
बुलडाणा, (जिमाका) दि.२४ : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता २१ ऑगस्ट २०२० पर्यंत प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी औषधालय, दवाखाने व दूध वितरण, संकलन वगळून इतर सर्व बाबींवर बंदी घालण्यात आली असून या दोन्ही दिवशी कडक संचारबंदी (कर्फ्यु) लागू राहणार आहे. असे आदेश यापूर्वी निर्गमीत करण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांसाठी मका खरेदी केंद्र शनिवार व रविवार उघडे राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी शनिवार व रविवारसह सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत महा ई सेवा व सीएससी केंद्र सुरू राहणार आहेत, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.