रेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅब या औषधांच्या वापराबाबत मार्गदर्शन आवश्यक – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई, दि. २५ : कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे प्रामुख्याने रेमडेसीवर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब  (Tocilizumab Inj) या औषधाच्या वापराबद्दल संभ्रम निर्माण होत असून या औषधांच्या वापराबाबत कोविड टास्कफोर्सच्या माध्यमातून निश्चित असे मार्गदर्शन होणे आवश्यक आहेअसे मतअन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले आहेया आशयाची मागणी करणारे पत्र त्यांनी नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहीले आहे.

आपल्या पत्रात डॉ. शिंगणे यांनी लिहीले आहे, कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅब या औषधांच्या वापराबद्दल सध्या संभ्रम आहे. या औषधाची मागणी जास्त आणि पुरवठा मर्यादित असल्याने तुटवडा भासत आहे रुग्णालयांकडुन दाखल असलेल्या रुग्णांसाठी या दोन्ही औषधांची मागणी केली जाते आहे. काही ठिकाणी ही औषधे जास्तप्रमाणात प्रिस्क्राईब केले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे, कोविड रिपोर्ट येण्यापुर्वी किंवा रिपोर्ट आल्यानंतर पहिल्या दिवशीच ही औषधे प्रिस्क्राईब केलेली किंवा एकाच प्रिस्क्रीपशन वर दोन्ही औषधे मागवलेली असल्याची माहिती मिळाली आहे. 

कमी पुरवठ्यामुळे औषध रुग्णाला वेळेवर मिळणार नाही या भीतीपोटी अगोदरच औषधाची मागणी केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची जनतेच्या मनातील भीती व संभ्रम दूर करण्यासाठी राज्यस्तरावर नेमण्यात आलेल्या कोविड टास्क फोर्समार्फत रेमडेसीवर व टोसीलीझुमॅब ही औषधे रुग्णाचा कोविड पॉजीटीव रिपोर्ट आल्या नंतर कोणत्या दिवशी व कोणत्या परिस्थितीत द्यावीत, तसेच ही दोन्ही औषधे एकाच वेळी रुग्णांना देता येतात का? याबाबत राज्यातील जनतेला मार्गदर्शन व्हावे यासाठी कोविड टास्क फोर्सला उचित निर्देश देण्याची विनंती डॉ. शिंगणे यांनी आरोग्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.