मुंबई, दि.26:आठवडा विशेष टीम― राज्यात 1 ते 25 जुलैदरम्यान 873 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 24 लाख 20 हजार 827 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनचा लाभ घेतला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
राज्यात एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलैमध्ये आतापर्यंत 24 लाख 20 हजार 827 असे दि. 1 एप्रिल ते दि. 25 जुलै या कालावधीत एकूण 1 कोटी 14 लाख 356 गरीब व गरजू लोकांनी ‘शिवभोजन’चा लाभ घेतला आहे.