महाराष्ट्र राज्यातील आठवड्यातील विशेष घडामोडी

दि. १९ ते २५ जुलै २०२० या कालावधीतील शासनाचे महत्त्‍वाचे निर्णय आणि घडामोडी यांचा संक्षिप्त आढावा

कोरोना युद्ध

१९ जुलै २०२०

  • 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु. 1 जुलै ते 18 जुलैपर्यंत 1 कोटी 3 लाख 49 हजार 401 शिधापत्रिका धारकांना 22 लाख 12 हजार 170 क्विंटल अन्नधान्याचे वाटप. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र 7 कोटी लाभार्थ्यांना 12 लाख 31 हजार 936 क्विंटल गहू, 9 लाख 44 हजार 375 क्विंटल तांदूळ, 12 हजार 829 क्विंटल साखरेचे वाटप. स्थलांतरित परंतु लॉकडाऊनमुळे अडकलेल्या 2 लाख 28 हजार 560 शिधापत्रिका धारकांमार्फत पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलइन पद्धतीने अन्नधान्याची उचल. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (गहू आणि तांदूळ प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो मोफत) आतापर्यंत 1 लाख 62 हजार 601 रेशनकार्डवरील 7 लाख 17 हजार 275 लाभार्थ्यांना 35 हजार 860 क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप. कोविड-19 संकटावरील उपाययोजना (एपीएल केसरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो, प्रति व्यक्ती 5 किलो धान्य)- 3 कोटी 8 लाख 44 हजार 76 नागरिकांना मे व जून महिन्यासाठी 13 लाख 4 हजार 46 क्विंटल वाटप.
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (प्रति रेशनकार्ड 1 किलो तूर किंवा चणा डाळ मोफत)- आतापर्यंत 3 लाख 74 हजार 228 क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप.
  • आत्मनिर्भर भारत (राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ)- 1 लाख 30 हजार 799 क्विंटल तांदूळ वितरित.
  • 1 जुलै ते दि . 18 जुलैपर्यंत 870 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 17 लाख 66 हजार 333 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत 306 विमानांद्वारे 44 हजार 23 प्रवासी मुंबईत दाखल. यातील मुंबईचे प्रवासी- 14 हजार 907.उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी- 15 हजार 399 , इतर राज्यातील प्रवासी- 13 हजार 925.
  • अंगणवाडी सेविकांना कोविड-१९ सर्वेक्षण कामातून वगळण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्यामार्फत मान्य, त्यानुसार सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांना निर्देश.
  • 3906 रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.62 टक्के, आतापर्यत घरी परतलेले रुग्ण- १ लाख ६९ हजार ५६९. आज ९५१८ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख ६४ हजार १२९ नमुन्यांपैकी ३ लाख १० हजार ४५५ नमुने पॉझिटिव्ह (१९.८५ टक्के). ७ लाख ५४ हजार ३७० लोक होम क्वारंटाइन. ४५ हजार ८४६ लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज २५८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ३.८२ टक्के.
  • कोविड विषाणूची खासगी दवाखान्यातील बिले लेखा परीक्षकांकडून तपासून घेतल्यावरच रुग्णांना दिली जावीत. त्यासाठी खासगी रुग्णालयांसाठी स्वतंत्र लेखा परीक्षक नियुक्त करण्याच्या सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांच्या सूचना.

२० जुलै २०२०

  • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांपैकी २० जुलै २०२० अखेर २७.३८ लाख खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ, पात्र खातेदारांच्या यादीतील ८३ टक्के खातेदार लाभान्वित.२०१९-२० या आर्थिक वर्षात १९ लाख खातेदारांना ११ हजार ९९३ कोटी रुपयांचा लाभ, २०२०-२१ या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण ५६५३ कोटी रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात जमा.
  • वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत ३१३ विमानांद्वारे ४४ हजार ९०१ प्रवासी मुंबईत दाखल. यातील मुंबईचे प्रवासी- १५ हजार ९५, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी- १५ हजार ६०१ आणि इतर राज्यातील प्रवासी- १४ हजार २०५
  • ‘कोरोना’ संकटकाळात मच्छिमारांच्या नौकांच्या डिझेलवरील मूल्यवर्धित कराच्या प्रतिपूर्ती परताव्याच्या रक्कमेतून राष्ट्रीय विकास निगमच्या कर्जाची वसुली न करण्याची मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. अस्लम शेख यांची मागणी,वित्त विभागामार्फत मान्य.
  • महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सायबर संदर्भात ५५० गुन्हे दाखल, २८८ व्यक्तींना अटक.
  • मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्यामार्फत सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा आढावा. ठळक मुद्दे– रुग्णांची झपाट्याने वाढती संख्या थोपवा, चेस दि व्हायरसची मोहीम प्रभावीपणे राबवून सोलापूर कोरोनामुक्त करा, येणाऱ्या काळात विलगीकरण व इतर आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढवा, विडी कामगार,हातमाग, यंत्रमागातील कामगारांमध्ये व्यवसायामुळे फुफ्फुसे, श्वसनाशी संबंधित रोग मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी झालेली हे लक्षात घेऊन त्यांना विषाणूचा संसर्ग होण्यापूर्वी प्रशासनाने त्यांच्याकडे गतिने पोहचणे आवश्यक, रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवा. खासगी डॉक्टर्सची सेवा घ्या, विलगीकरण सुविधा वाढवा, 60 वर्षांच्या पुढील सर्वांची ऑक्सिजन पातळी तपासा, त्यांना इतर कुठले आजार झाले आहेत का,याची तपासणी करा, कोणत्याही दडपणाला बळी न पडता आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर द्या. इमारतीऐवजी मोठे सभामंडप, गोडावून ताब्यात घेऊन सुविधा निर्माण करा.
  • 1 जुलै ते दि. 19 जुलै पर्यंत 18 लाख 56 हजार 393 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • 1 जुलै ते 19 जुलैपर्यंत 1 कोटी 8 लाख 69 हजार 184 शिधापत्रिका धारकांना 23 लाख 89 हजार 196 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे २१ ते २४ जुलै दरम्यान ऑनलाइन पद्धतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन.या मेळाव्यासाठी रोजगार देणाऱ्या १३ कंपन्या व नियोक्त्यांकडून www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अधिसूचित. संपर्क- ०२२-२२६२६३०३
  • २२ मार्च ते १९ जुलै या कालावधीत १,९५,२८४ गुन्ह्यांची नोंद, ३१,०३२ व्यक्तींना अटक. अवैध वाहतूक करणाऱ्या १३४६ वाहनांवर गुन्हे दाखल.
  • सायबर संदर्भात ५५० गुन्हे दाखल, २८८ व्यक्तींना अटक.
  • कोविड विषाणूच्या संसर्गामुळे उदभवलेल्या परिस्थितीत विजाभज, विमाप्र,इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्याची 2019-20 या शैक्षणिक वर्षातील किंवा तत्पूर्वीची शैक्षणिक संस्थांना देय असलेली शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त असल्याच्या सबबीखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये, त्याचप्रमाणे विद्यार्थ्याना आवश्यक दाखले, प्रमाणपत्र, दस्तावेज उपलब्ध करून देण्यात यावे असे, मॅट्रीकोत्तर शिक्षण देणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थाना शासनाचे आदेश.
  • गेल्या २० दिवसात कोरोनाचे ८४ हजार ११८ रुग्ण बरे, याकाळात दिवसाला सरासरी ४२०० रुग्ण बरे, आज ५४६० रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के, आतापर्यत घरी परतलेले रुग्ण- १ लाख ७५ हजार २९, आज ८२४० नवीन रुग्णांचे निदान, १ लाख ३१ हजार ३३४ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ६६७ नमुन्यांपैकी ३ लाख १८ हजार ६९५ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के). ७ लाख ६५ हजार ७८१ लोक होम क्वारंटाइन. ४५ हजार ४३४ लोक संस्थात्मक क्वारंटाइन.आज १७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ३.७७ टक्के.

२१ जुलै २०२०

  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ९७ हजार गुन्हे दाखल. ३१,३३२ व्यक्तींना अटक. अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख १९ हजार ७९४ पासेसचे वितरण, या कालावधित पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३१५ घटना. त्यात ८८१ व्यक्तींना ताब्यात. हेल्पलाइन १०० क्रमांकावर १ लाख ७ हजार दूरध्वनी,हातावर क्वारंटाइन असा शिक्का असलेल्या ८०५ व्यक्तींना शोधून त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी. अवैध वाहतूक करणाऱ्या १३४६ वाहनांवर गुन्हे दाखल.
  • ७१८८ रुग्णांची घरी रवानगी,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.७२ टक्के. घरी परतलेले रुग्ण- १ लाख ८२ हजार २१७. आज कोरोनाच्या ८३६९ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ३२ हजार २३६ रुग्णांवर उपचार सुरू. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ४० हजार ६४४ नमुन्यांपैकी ३ लाख २७ हजार ३१ नमुने पॉझिटिव्ह (१९.९३ टक्के). ७ लाख ७९ हजार ६७६ लोक होमक्वारंटाइन, ४५ हजार ७७ लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज २४६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ३.७५ टक्के.
  • 1 जुलै ते 20 जुलैपर्यंत 1 कोटी 13 लाख 73 हजार 331 शिधापत्रिका धारकांना 25 लाख 72 हजार 109 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • 1 जुलै ते दि . 20 जुलै पर्यंत 19 लाख 48 हजार 430 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.

२२ जुलै २०२०

  • मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची राज्यातील विविध पॅथींचे तज्ज्ञ व वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा. ठळक मुद्दे- कोरोना रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शक सूचना टास्क फोर्सकडे द्याव्यात, यामुळे एकात्मिक औषधोपचार देणे शक्य. आयुष मधील औषधांची प्रतिबंधात्मक आणि उपचार अशा दोन भागात विभागणी करून सर्वसमावेशक सूचना टास्क फोर्सकडे सादर करण्याचे श्री ठाकरे यांचे निर्देश.
  • महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सायबर संदर्भात ५५४ गुन्हे दाखल. २८८ व्यक्तींना अटक.
  • २२ मार्च ते २१ जूलै या कालावधीत २,०१,१५८ गुन्ह्यांची नोंद, ३१,३३२ व्यक्तींना अटक.
  • मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत आतापर्यंत 2481 मे.टन गहू व 2310 मे.टन तांदूळ इतक्या अन्नधान्याचे वितरण.
  • केंद्र शासनामार्फत किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदीस ३१ जुलैपर्यंत २५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यास मुदतवाढ दिली असल्याची अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती.
  • ५५५२ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के, बरे होऊन घरी गेलेले रुग्ण- १ लाख ८७ हजार ७६९. आज कोरोनाच्या १० हजार ५७६ रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ नमुन्यांपैकी ३ लाख ३७ हजार ६०७ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के). ८ लाख ५८ हजार १२१ लोक होम क्वारंटाइन. ४४ हजार ९७५ लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज २८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ३.७२ टक्के.
  • कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीच्या उपचारावरून जनतेची फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्याने त्याबाबत नागरिकांनी सावध राहण्याचे राहावे, गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचे आवाहन.

२३ जुलै २०२०

  • वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात अशा, वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री अमित विलासराव देशमुख यांचे कुलगुरुंना निर्देश.
  • मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड-19 तपासणी प्रयोगशाळेचे ऑनलाइन लोकार्पण. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख उपस्थित.ठळक मुद्दे- कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी 131 प्रयोग शाळांची उभारणी, महाराष्ट्र हे देशातीलच नव्हेतर जगातील सर्वोच्च व सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे राज्य घडवण्याचे श्री ठाकरे यांचे सुतोवाच.
  • २२ मार्च ते २२ जुलै या कालावधीत २,१२,१०६ गुन्ह्यांची नोंद, ३१,४७३ व्यक्तींना अटक.
  • वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत 339 विमानांद्वारे 48 हजार 271 प्रवासी मुंबईत दाखल, यातील मुंबईचे प्रवासी- 16 हजार 85, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी- 16 हजार 727 , इतर राज्यातील प्रवासी- 15 हजार 459
  • गेल्या चार महिन्यातील पोलिसांची कामगिरी – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून २२ जुलै पर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २,१२,१०६ गुन्ह्यांची नोंद, ३१,४७३ व्यक्तींना अटक, अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख २९ हजार ८८३ पासेसचे वितरण, या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३१६ घटना, त्यात ८८१ व्यक्ती ताब्यात, हेल्पलाइन क्रमांक १०० क्रमांकावर १,०८,१११ दूरध्वनी. क्वारंटाइन असा शिक्का लावलेल्या ८०५ व्यक्तींना शोधून त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी. अवैध वाहतूक करणाऱ्या १३४६ वाहनांवर गुन्हे दाखल. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कार्यरत ९० पोलिसांचा मृत्यू. पोलिसांना कोरोना संदर्भातील लक्षणे दिसून आल्यास तातडीने उपचार करण्यासाठी २०१ नियंत्रण कक्षाची निर्मिती, सध्या कोरोना बाधित १५१९ अधिकारी व पोलिसांवर उपचार सुरू.
  • स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा १० ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवून पर्यंत करण्याचे, कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश. योजनेंतर्गत प्रस्तावांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी मोबाईल ॲप आणि पोर्टलची निर्मिती.
  • प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित शेतकऱ्यांचा कृषी मंत्री श्री दादाजी भूसे यांच्याद्वारे आढावा.ठळक मुद्दे- अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांसाठी ५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवून त्रुटी दुरस्त करा, नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करा. या योजनेंतर्गत ९१ लाख १३ हजार शेतकरी लाभान्वित. त्यांच्या खात्यात पाच हप्त्यात ६९४९ कोटी रुपये जमा. १ कोटी ५२ लाख शेतकऱ्यांपैकी या योजनेंतर्गत आतापर्यंत १ कोटी ४ लाख शेतकऱ्यांची नोंदणी, काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळल्याने योजनेचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने विशेष मोहीम. कोरोना संकटकाळात १ एप्रिल नंतर योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात २४४१ कोटी रक्कम थेट जमा.
  • ६४८४ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के, आतापर्यंत घरी परतलेले रुग्ण- १ लाख ९४ हजार २५३. आज ९८९५ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ४० हजार ९२ रुग्णांवर उपचार सुरू. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ लाख ३७ हजार ७१६ नमुन्यांपैकी ३ लाख ४७ हजार ५०२ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के). ८ लाख ७४ हजार २६७ लोक होम क्वारंटाइन, ४४ हजार २२२ लोक संस्थात्मक क्वारंटाइन. २९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ३.७ टक्के.

२४ जुलै २०२०

  • 1 जुलै ते दि . 23 जुलैपर्यंत 22 लाख 35 हजार 152 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.
  • 1 जुलै ते 23 जुलैपर्यंत 1 कोटी 28 लाख 14 हजार 981 शिधापत्रिका धारकांना 32 लाख 20 हजार 768 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्स आणि राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचा संवाद आणि चर्चा. ठळक मुद्दे- कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून मृत्यूदर कमी होईल. ग्रामीण भागात सुविधा मर्यादित असल्याने त्या झपाट्याने वाढवणे आवश्यक, मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य. उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसूत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली असल्याने औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक, रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणे महत्वाचे ठरते.
  • वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत 348 विमानांद्वारे 49 हजार 63 प्रवासी मुंबईत दाखल. यातील मुंबईचे प्रवासी- 16 हजार 395 . उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी- 17 हजार 80, इतर राज्यातील प्रवासी- 15 हजार 588.
  • कोरोनासाठी वापरात येणाऱ्या औषधांचा काळाबाजार करणाऱ्या महिलेस उल्हासनगर येथे २३ जुलै रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकामार्फत अटक, आतापर्यंत एकूण ४ कारवायांमध्ये १५ लोकांना अटक. छापील दरापेक्षा जास्त दराने औषधे विक्री होत असल्यास व औषधाचा काळा बाजार होत तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 1800 222 365 / ०२२- २६५९२३६२.
  • अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची प्रामुख्याने सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन, यासंदर्भातील शासन निर्णय जारी.
  • ५७१४ रुग्णांची घरी रवानगी. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के, बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ९९ हजार ९६७. आज कोरोनाच्या ९६१५ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ४३ हजार ७१४ रुग्णांवर उपचार सुरू. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ लाख ८७ हजार ३०६ नमुन्यांपैकी ३ लाख ५७ हजार ११७ नमुने पॉझिटिव्ह (१९.९८ टक्के). ८ लाख ८८ हजार ९७६ लोक होमक्वारंटाइन. ४५ हजार ८३८ लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज २७८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ३.६८ टक्के.

२५ जुलै २०२०

  • कोरोना उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) या औषधाच्या वापराबद्दल संभ्रम निर्माण होत असल्याने औषधांच्या वापराबाबत कोवीड टास्कफोर्सच्या माध्यमातून निश्चित मार्गदर्शन आवश्यक असल्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मत, याबाबत मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे विचारणा.
  • कोरोना आजाराच्या उपचारासाठी वापरात येणाऱ्या रेमडेसीवर व टोसीलीझुमॅब या औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनामार्फत राज्यभरात कारवाया वाढविण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे निर्देश. आतापर्यंत मुंबई व ठाणे येथे चार प्रकरणात कारवाई.
  • 1 जुलै ते दि .24 जुलैपर्यंत 23 लाख 30 हजार 319 गरीब व गरजू लोकांमार्फत शिवभोजनाचा लाभ .
  • 1 जुलै ते दि.24 जुलैपर्यंत 1 कोटी 32 लाख 80 शिधापत्रिका धारकांना 34 लाख 53 हजार 103 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • बेरोजगार युवक युवतींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत इतरमागास प्रवर्गाचा समावेश, सर्वसाधारण प्रवर्गात केल्याने इतर मागासवर्गीय प्रवर्गातील युवक युवतींवर अन्याय होत असून या योजनेत बदल करण्याची, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी.
  • वंदेभारत अभियानांतर्गत ३५९ विमानांद्वारे विविध देशातून मुंबईत ५० हजार १४९ प्रवासी दाखल, यामध्ये मुंबईतील प्रवासी – १६ हजार ७४६. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी – १७ हजार ४२१, इतर राज्यातील प्रवासी – १५ हजार ९८२.
  • कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोविड काळजी केंद्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन, पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित. ठळक निर्देश – मुंबई महानगर क्षेत्र परिसरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करा, वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच विषाणू प्रसाराला अटकाव करण्यासाठी दर्जेदार सुविधा निर्माण करा, ट्रेसिंग करण्यावर भर द्या, योग्य पद्धतीने रुग्ण सेवा, वैद्यकीय उपचार, पुरेशी ऑक्सिजन व्यवस्था करा, कोरोनाबाबत नागरिकांच्या मनातील भय दूर करण्यासाठी समुपदेशन उपलब्ध करुन द्या. सुविधा– डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात पाटीदार भवनाच्या पहिल्या मजल्यावरील 5000 चौरस फुटाच्या जागेत 70 बेड, 60 ऑक्सिजन सुविधासहित, 10 सेमी आयसीयू बेड, तिस-या मजल्यावर 5000 चौरस फुटाच्या जागेत ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड, 4 थ्या मजल्यावर देखील ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड, डॉ. राहुल घुले यांच्या 1 रुपी क्लिनीकमध्ये 2 एमडी फिजीशियन, 25 निवासी डॉक्टर, 50 परिचारिका व 30 हाऊसकिपिंग स्टाफ.
  • कल्याण पश्चिम येथील आसरा फाऊंडेशनच्या जागेतील कोव्हिड आरोग्य केंद्र- ऑक्सिजनसह 100 बेड, 84 सामान्य बेड ,10 सेमी आयसीयू बेड, 12 डॉक्टर्स, 20 नर्सेस, 20 वॉर्ड बॉय आणि फिजीशियन. कल्याण पश्चिम गौरीपाडा येथे महापालिकेचे सुसज्ज स्वॅब चाचणी केंद्र- दररोज 3000 चाचण्यांची सुविधा.
  • रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी, संचालक हितलभाई मेसवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीमार्फत भारतीय एज्युकेशन संकुलात निर्मित 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत ऑनलाइन उद्घाटन.
  • कोविड – १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी इयत्ता १ ली ते १२ वी चा विषय निहाय २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात येत असल्याची शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची घोषणा. अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक स्तरावरील २२, माध्यमिक स्तरावरील २० आणि उच्च माध्यमिक स्तरावरील ५९ अशा १०१ विषयांचा २५ % पाठ्यक्रम कमी. असा आहे निर्णय –1) भाषा विषयामध्ये काही गद्य व पद्य पाठ आणि त्यावरील स्वाध्याय कृती वगळण्यात आल्या आहेत . त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षेत या घटकांवर कोणत्याही कृती विचारल्या जाणार नाहीत. २)भाषा विषयामध्ये वगळण्यात आलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्य वगळलेले नाहीत .३) इतर विषयामध्ये कृतीची पुनरावृत्ती टाळून काही भाग स्वयंअध्ययनासाठी राखीव. ४)शालेय श्रेणी विषयासंदर्भात परिस्थिती व त्यानुसार उपलब्ध सोयी सुविधा यांचा विचार करून उपक्रम / प्रकल्प घेण्याच्या सूचना .४)प्रात्यक्षिक कार्य हे अध्ययन – अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरून आणि उपलब्ध परिस्थिती व सोयी सुविधा विचारात घेवून पूर्ण करण्याच्या सूचना. ५) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यामार्फत शैक्षणिक दिनदर्शिकेमधून पाठ्यक्रमातून कमी करण्यात आलेला भाग वगळण्यात येईल. ६) इयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय , विषय निहाय २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला भाग www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या संकेतस्थळावर उपलब्ध.
  • सायबर संदर्भात ५६० गुन्हे दाखल, २८८ व्यक्तींना अटक.
  • ७२२७ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के, आतापर्यंत बरे होऊन घरी परतलेले रुग्ण- २ लाख ७ हजार १९४, आज ९२५१ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ४५ हजार ४८१ रुग्णांवर उपचार सुरू. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १८ लाख ३६ हजार ९२० नमुन्यांपैकी ३ लाख ६६ हजार ३६८ नमुने पॉझिटिव्ह (१९.९४ टक्के). ८ लाख ९४ हजार ५०९ लोक होम क्वारंटाइन. ४४ हजार ६०३ लोक संस्थात्मक क्वारंटाइन. २५७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ३.६५ टक्के.
  • कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर स्वतःचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्याच्या मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आवाहनास प्रतिसाद देत परिवहनमंत्री अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांच्यामार्फत एकता मंच तसेच चैतन्य ओंकार ट्रस्ट यांच्या सहकार्याने १३ रुग्णवाहिका आणि जाणीव ट्रस्टतर्फे १२ रुग्णवाहिकांचे लोकार्पण.
  • यावर्षी पणन विभागामार्फत २१९.४९ लाख क्विंटल विक्रमी कापसाची खरेदी. हंगाम २०१९-२० मध्ये ४४.३० लाख हेक्टर कापसाची लागवड व विक्रमी पीक. कापूस खरेदीला विलंब होऊ नये यासाठी सीसीआय व कापूस पणन महासंघाद्वारे १२७ खरेदी केंद्र कोरोना पूर्वी सुरू,सध्या १९० केंद्रांवर खरेदीचे काम सुरू, हंगाम २०१९-२० मध्ये एकूण ३. ३३ लाख शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी. २०२०-२१ च्या पेरणी पूर्वी ४६०० कोटी रुपयांची खरेदी.

इतर निर्णय आणि घडामोडी

१९ जुलै २०२०

  • महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संचलित नवीन शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांची माहिती.

२० जुलै २०२०

  • महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजीटल स्त्री शक्ती’ उपक्रम,याअंतर्गत मुंबईसह राज्यातील 10 शहरातील 5000 महाविद्यालयीन तरुणींना वेबिनारच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण.

21 जुलै २०२०

  • मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ओबीसी व भटके विमुक्तांच्या न्याय मागण्यांसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित. ठळक मुद्दे मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही. ओबीसींचे कोणतेच प्रश्न दुर्लक्षित राहणार नाहीत. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. विचारपूर्वक, कायमस्वरूपी ठोस निर्णय घेतले जातील. बारा बलुतेदार समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जाईल. ओबीसी महामंडळांसाठी आर्थिक तरतुद करुन जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येईल. ओबीसी आरक्षण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये मंत्रिमंडळ उपसमितीमार्फत न्याय देण्याचा प्रयत्न करणार. महाज्योतीचे कार्यालय नागपूर येथे असून ओबीसी शिष्यवृत्तीसाठी असलेल्या एक हजार कोटी पैकी पाचशे कोटी मिळणार आहेत. बिंदुनामावली व पदोन्नतीबाबत प्रश्न सोडवण्यात येतील.
  • मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्या निधनाबद्दल राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्यामार्फत दुःख व्यक्त.
  • मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे कृषीविद्यापीठाच्या कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद. कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, उपस्थित. ठळक मुद्दे- महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके विकसित करा. ज्याला बाजारपेठ आहे अशी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करा. विद्यापीठातील संशोधनातून शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात बदल घडवून आणा. विभागवार निश्चित केलेल्या दर्जाचीच पिके मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत कशी विकली जातील यादृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. विभागवार पिके पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची सभासद नोंदणी शासनाकडे करा, बाजारपेठेची शाश्वती देण्याचे प्रयत्न करा. शेतीमध्ये दर्जोन्नती (अपग्रेडेशन) आणि सुधारणा (रिफॉर्म्स) घडवून आणा, शेतमालासाठीही “गोल्डन अवर” महत्वाचा असून वेळेत शेतमालाची खरेदी आणि विक्री होईल अशी व्यवस्था निर्माण करा. कोणताही उद्योजक गुंतवणूक करताना आधी जसे मार्केट सर्व्हे त्याचप्रमाणे शेती उत्पादनांबाबत मार्केट सर्व्हे करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवा. शेतीसाठी उपयुक्त ठरणारी लहान यंत्रे विकसित करा,रानभाज्या आणि औषधी वनस्पतींचे ब्रॅंडिंग करा.
  • महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरतीकरीता असलेल्या १०० बिंदुनामावलीत इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक या संवर्गावरील अन्याय दूर करण्यासंदर्भात श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे बैठकीचे आयोजन, यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री, श्री. विजय वडेट्टीवार उपस्थित.
  • राज्यात केंद्र शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत आलेल्या अपंग समावेशीत योजनेचा विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्यामार्फत आढावा, योजनेत कार्यरत शिक्षकांचे वेतन तातडीने दिले जावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश. शालेय शिक्षण मंत्री, प्रा. वर्षा गायकवाड उपस्थित.
  • ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय राजकीय हेतूने नाही,त्र्याहत्तरावी घटनादुरूस्ती, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय,कोरोनाची परिस्थिती या बाबींचा विचार करूनच निर्णय घेतल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्राद्वारे माहिती.
  • ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजीटल स्त्री शक्ती या उपक्रमाचा महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्यामार्फत वेबिनारच्या माध्यमातून शुभारंभ. ठळक मुद्दे– स्मार्टफोन, इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले असून त्याचा वापर वाढत असल्याने युवती, महिलांना ‘डिजीटली सक्षम’ करणे काळाची गरज असल्याचे ॲड ठाकूर यांचे प्रतिपादन. संकटग्रस्त महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी राज्य महिला आयोगाचे कार्यालय प्रत्येक विभागस्तरावर लवकरच कार्यान्वित करण्याचा निर्णय घोषित.
  • गणेशखिंड उद्यान पुणे येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या विभागीय कृषी संशोधन केंद्रातील 33.01 हेक्टर क्षेत्र व जळगाव शहरालगत लांडोरखोरी येथील 48.08 हेक्टर क्षेत्र जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची, वनमंत्री संजय राठोड यांची माहिती.
  • दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी नवीन योजना कार्यान्वित करण्याची श्री केदार यांची माहिती.

२२ जुलै २०२०

  • अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या विम्याच्या रक्कमेचा धनादेश तत्काळ निवृत्तीच्या दिवशीच देण्याची सुविधा निर्मिती आणि सध्या प्रलंबित विमा प्रकरणे महिनाभरात निकाली काढण्याचे, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश.
  • वित्त विभागाच्या अधिसूचनेनुसार ८.४२ टक्के महाराष्ट्र शासन रोखे २०२० अदत्त शिल्लक रकमेची २४ ऑगस्ट २०२० पर्यंत देय व्याजासह, २५ ऑगस्ट २०२० रोजी सममूल्याने विक्री. यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.
  • शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीचे काम गतीने पूर्ण करुन उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनेच्या कामांना वेग देण्याचे यावा, ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे, पुणे प्रादेशिक विभागातील विविध कामे व योजनांच्या बैठकित आदेश.

२३ जुलै २०२०

  • कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून पणन विभागामार्फत गेल्या दहा वर्षातील विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी,मंत्री मंडळामार्फत पणन मंत्री व विभागाचे अभिनंदन.

मंत्रीमडळ निर्णय

  • महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील विविध कलमात सुधारणा करण्याचा निर्णय. यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कालावधीस आणि लेखा परीक्षणास मुदतवाढ देण्याची सुधारणा.
  • निसर्ग चक्रीवादळामुळे पूर्णत: नष्ट झालेल्या सुपारी व नारळाच्या झाडांना विशेष बाब म्हणून प्रति झाडाप्रमाणे वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय. प्रति झाड – सुपारी – रू 50/, नारळ – रू. 250/-
  • मौजे भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन वटवृक्ष वाचविण्यासाठी पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ट मंत्रालयाला केलेली विनंती मान्य. हा वटवृक्ष तोडण्यात येणार नाही.
  • डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत १२१ मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती.
  • २७ जुलै रोजी येणारा वाढदिवस साजार करणार नसल्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा निर्णय. कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालय किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत’, असे श्री ठाकरे यांचे जनतेस आवाहन.
  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्याद्वारे मातोश्री बंगल्यावर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याद्वारे मंत्रालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन.
  • वसुंधरा व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पारंपरिक ऊर्जेवरील राज्याची निर्भरता कमी करण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित अपारंपरिक ऊर्जानिर्मिती करण्यावर अधिक भर देण्याची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स सोबतच्या ई-बैठकीत घोषणा.

24 जुलै 2020

  • मुंबई शहर-उपनगर जिल्हयातील मातंग समाजातील मांग, मातंग. मिनी मादीग, मादिंगा, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण इयत्ता १० वी, १२वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी उत्तीर्ण इ. करिता सरासरी ६० पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. संपर्क- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), मुंबई-गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१
  • कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या ttp://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना नाव नोंदणीची सोय उपलब्ध. संबंधित उमेदवारांना स्वत:च्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांक जोडणे आवश्यक, अन्यथा 15 ऑगस्टनंतर त्यांची नोंदणी रद्द होणार असल्याची सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर यांची माहिती.
  • ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांच्या निधनाने तत्वनिष्ठ कायदेतज्ञ हरपला असल्याच्या शोकभावना उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडून व्यक्त.
  • राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची प्रामुख्याने सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन, यासंदर्भातील शासन निर्णय जारी.
  • आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कोकणाकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यांचा आढावा घेऊन आवश्यकता असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांचे निर्देश.
  • ज्येष्ठ विधिज्ञ व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या निधनाबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याव्दारे शोकभावना व्यक्त.
  • पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्यामार्फत एमएमआर क्षेत्रात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा.

25 जुलै 2020

  • बेरोजगार युवक युवतींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत इतरमागास प्रवर्गाचा समावेश, सर्वसाधारण प्रवर्गात केल्याने इतर मागासवर्गीय प्रवर्गातील युवक युवतींवर अन्याय होत असून या योजनेत बदल करण्याची, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी.
  • गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्यामार्फत पुणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा बैठकीत सूचना. पुणे शहर पोलिसांनी हद्दपार आरोपींसाठी तयार केलेली “ExTra” (Tracking of Externees) अॅप उपयुक्त असल्याचे श्री देशमुख यांचे प्रतिपादन.
  • गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्याहस्ते ज्येष्ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार (वय वर्ष 85) यांना 1 लक्ष रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरव.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.