बीड ,परळी ,गेवराई शहरसह केज, पाटोदा, गेवराई तालुक्यातील विविध ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित

बीड दि.२६:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे बीड शहरातील २ ,परळी शहरातील २, गेवराई शहरातील ३ तसेच केज १,पाटोदा १ आणि गेवराई तालुक्यातील १ ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.

याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक आहे.

बीड शहरातील शिवाजीनगर व पंचशील नगर,
परळी शहरातील पद्मावती कॉल व पोलीस कॉलनी गेवराई शहरातील बेदरे गल्ली, महेश नगर व न्यू हायस्कूल पूर्व बाजू शारदानगर, गेवराई तालुक्यातील मौजे सिंदखेड (भिल्लवस्ती), केज तालुक्यातील बनसारोळा आणि पाटोदा तालुक्यातील मौजे घाटेवाडी येथे या गावात व वरील संबंधित परिसरात कंटेनमेंट झोन ( Containment Zone) घोषित करण्यात आले आहे असे आदेशात नमूद केले आहे. तसेच सर्व संबंधित ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहेत.

राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै २०२० रोजीच्या रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम (१) (३) लागू करण्यात आले आहेत.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.