सोलापूर: वीर जवान भास्कर वाघ यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री भरणे यांनी केले सांत्वन

Last Updated by संपादक

सोलापूर, दि.२७:आठवडा विशेष टीम― बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडी येथील वीरजवान भास्कर वाघ यांना लडाखमध्ये अपघाती वीरमरण आले होते. रविवारी रात्री पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वीरजवान वाघ यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करून धीर दिला.

श्री. भरणे म्हणाले, आज कारगिल विजय दिवस आहे. वीरजवान वाघ हे आपल्या सेवेसाठी सैन्यात भरती झाले होते. त्यांचा काश्मिरमधील लेहमधून कारगिलकडे जाताना अपघातात मृत्यू झाला होता. शासन त्यांच्या कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील. शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. ग्रामस्थांनी वीरजवान वाघ यांच्या कुटुंबाला आधार देऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

वीरजवान वाघ यांच्या कुटुंबियांच्या वतीने जि.प. सदस्या रेखा राऊत यांनी पत्नी राणी वाघ यांना अंगणवाडीसेविका म्हणून घेण्याची मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्री श्री. भरणे यांच्याकडे केली.

यावेळी आमदार यशवंत माने, सरपंच श्री. जाधवर, वीरजवान वाघ यांचे वडील सोमनाथ वाघ, आई राजूबाई, पत्नी राणी, दोन्ही मुली, मुलगा आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.