मुंबई, दि 27:आठवडा विशेष टीम― मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावपूर्ण शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात पंतप्रधान म्हणतात की, वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो, त्याबरोबरच हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची. मला विश्वास आहे की आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल. आपल्याला वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे.