प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर, दि. 27:आठवडा विशेष टीम― राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज दीक्षाभूमीला सदिच्छा भेट दिली. त्यांनी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करुन अभिवादन केले. विलास गजघाटे, सुधीर फुलझेले व एन. आर. सुटे यावेळी उपस्थित होते.

दीक्षाभूमी येथील बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे राज्यपालांनी दर्शन घेतले. दीक्षाभूमी येथील बाबासाहेबांच्या चित्र प्रदर्शनाची पाहणीही राज्यपालांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button