महाराष्ट्राला जीएसटी परताव्यापोटी १९ हजार २३३ कोटींचा निधी

नवी दिल्ली दि.२७:आठवडा विशेष टीम

आर्थिक वर्ष २०१९-२० च्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) परताव्याचा महाराष्ट्राच्या वाट्याचा १९ हजार २३३ रुपयांचा निधी आज केंद्र शासनाने जारी केला.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक वर्ष २०१९-२०च्या जीएसटी परताव्याचा १ लाख ६५ हजार ३०२ रूपयांचा निधी जारी केला आहे. याच कालावधीत देशात उपकरापोटी ९५ हजार ४४४ कोटींचा निधी संकलित झाला आहे.

देशातील एकूण ३१ राज्य व केंद्रशासित प्रदेशांना जारी करण्यात आलेल्या जीएसटी परताव्याच्या एकूण रकमेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याचा १९ हजार २३३ कोटींचा निधीही जारी करण्यात आला आहे. केंद्राने यावर्षी मार्च महिन्यात जीएसटी परताव्यापोटी राज्य व केद्रशासित प्रदेशांना १३ हजार ८०६ रूपयांचा निधी जारी केला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.