कोरोनाला रोखण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम राबवावा – पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

Last Updated by संपादक

चिखली येथे कोरोना संसर्ग परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

बुलडाणा,दि.29 : दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून याला चिखली तालुका देखील अपवाद नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवायचे असेल तर नियमित मास्क वापरने, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे आणि वारंवार हात धुणे हा त्रिसूत्री कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे, असे मत पालकमंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांनी व्यक्त केले. ते चिखली येथे आयोजित कोरोना आढावा सभेदरम्यान बोलत होते.

यावेळी माजी आमदार राहुल बोन्द्रे, रेखाताई खेडेकर, पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे, नगराध्यक्षा प्रिया बोन्द्रे, जि.प. सदस्य ज्योती खेडेकर, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा परिषद मुख्याधिकारी षण्मुखराजन, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कांबळे, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार अजितकुमार येळे, पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ, न.प.मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यासह शहरातील डॉक्टर, व्यापारी, पत्रकार व अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रतिबंधित क्षेत्र करताना नियमानुसार कार्यवाही करण्याचे सूचीत करीत पालकमंत्री म्हणाले, प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करताना कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. कंटेन्टमेंट मधील नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, सामान्य रूग्णालयाची आरोग्य सुविधा दर्जेदार ठेवाव्यात. कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या नागरिकांशी सौजन्याने वागून चांगली सुविधा द्या.

यावेळी शहरातील मान्यवरांच्या समस्या व सूचना ऐकून घेण्यात आल्या. पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले, की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोतपरी प्रयत्न करत आहे. परंतु जनतेने नियमांचे पालन न केल्यास काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे जनतेने नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी सुमन चंद्रा म्हणाल्या, जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री दर शनिवारी रविवारी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेऊन परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नाला आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. प्रशासनाला गरज भासेल तेव्हा आम्ही सर्व खाजगी डॉक्टर प्रशासनाला सहकार्य करू असे आश्वासन याप्रसंगी चिखली मेडिकल असोसिएशनने दिले. सभेला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.