चंद्रपूर, दि. 29 : तेजश्री योजने अंतर्गत जिल्ह्यातील 11 तालुक्यामधील अतिगरीब महिलांकरीता कर्जसहाय्य देणे, कर्जाच्या विळख्यांमध्ये अडकलेल्या महिलांना कर्जसहाय्य करणे, महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविम प्रमोटेड सीएमआरसीमार्फत सुरु असलेल्या सोशल एंटरप्राईज उपक्रमांकरीता कर्जसहाय्य पुरवठा केला जात आहे. तेजस योजनेअंतर्गत 11 तालुक्यातील माविम चंद्रपूर अंतर्गत स्थापित 9 लोक संचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा व व्यवस्थापक यांना सदर योजना त्यांच्या तालुक्यात राबविणे व अंमलबजावणी करीता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याहस्ते धनादेश देऊन निधी वाटपाचा शुभारंभ नियोजन भवन येथे करण्यात आला.
जिल्ह्यातील अती गरीब महिला तसेच कर्ज विळख्यात अडकलेल्या व आर्थिक संकटात अडकलेल्या महिलांकरीता ही योजना खूप मोलाची भूमिका बजावणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी माविम नरेश उगेमुगे प्रामुख्याने उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 11 तालुके हे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत येतात. माविम मार्फत या तालुक्यात तेजश्री कार्यक्रम राबविल्या जाणार आहे. सदरचे कार्यक्रम 3 वर्ष कालावधी करिता राबविणे अपेक्षित असून सन 2020-21 करिता चंद्रपूर जिल्ह्यात 1 हजार 650 अल्ट्रा पुअर महिला व 350 कर्ज विळख्यात अडकलेले महिला कुटुंबाना लाभ देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलेले आहे.
ooooo