‘ईझी टेस्ट ई- लर्निंग’ ॲपचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अकरावी  बारावी साठीचे ऑनलाइन शिक्षण ॲप राज्यातील  विद्यार्थ्यांना खुले – पालकमंत्री धनंजय मुंडे

मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण

बीड, दि.२७ : जिल्ह्यातील इयत्ता 11 वी 12वी च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी इझी लर्निंग अ‍ॅपचे आज उद्घाटन झाले. जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण आगळा वेगळा उपक्रम आहे यामुळे बीड सारख्या मागासलेल्या जिल्ह्यात देखील कोरोना संसर्गाच्या काळात अतिशय चांगले काम झाले असून  राज्यातील  विद्यार्थ्यांना खुले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे  यांनी केले.

पालकमंत्री  धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक झाली. याप्रसंगी ईझी लर्निंग ॲपचे लोकार्पण धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर आ. बाळासाहेब आजचे,  आ. संजय दौंड,  पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्यासह  विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री मुंडे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी  महत्त्वपूर्ण असणाऱ्या  या ॲपचा  उपयोग  जिल्‌ह्याबरोबरच राज्यातील विद्यार्थ्यांना देखील होईल. यासाठी  जिल्हाधिकारी व  जिल्हा प्रशासन यांचे महत्त्वाचे योगदान आहे या ॲपमध्ये तांत्रिक दृष्ट्या अधिक सुलभ करण्याची सूचना दिली.

पालकमंत्री पुढे म्हणाले कोरोना संसर्गासाठी शासनाच्या वतीने अनेक उपाय योजना केल्या जात आहेत बीड जिल्ह्यातील स्थिती राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली असली तरीही प्रशासनास अधिक सतर्क राहण्याची गरज आहे रुग्णांसाठी असलेल्या उपचाराच्या सुविधा बेडची सज्जता व्हेंटिलेटर यांची गरज या सर्व बाबींकडे लक्ष दिले जावे

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोलताना श्री मुंडे म्हणाले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार १२० कोटी रुपये कर्जमाफी राज्य शासनाकडून देण्यात आली आहे , जिल्ह्यातील शेतकरी पीक खरीप पीक कर्जासाठी पात्र ठरले असून त्यांना पीक वरील खरीप कर्ज उपलब्ध केले जावे. याच बरोबर जिल्ह्यात नियुक्त केलेल्या  प्रधानमंत्री पिक विमा योजनेत आत्तापर्यंत बारा लक्ष 51 हजार शेतकरी खातेदारांनी पिक विमा घेतला आहे ही जिल्ह्यासाठी महत्त्वाची बाब आहे असे पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले

जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले बीड जिल्ह्यातील इयत्ता अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चर्स आॅनलाइन माध्यमातून मिळावेत म्हणून तीन महिन्यांपूर्वी  जिल्हा प्रशासनामार्फत ईझी टेस्ट लर्निंग अ‍ॅपचे उपक्रमाची सुरुवात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते केली होती.

ते म्हणाले,  या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध शाळातील अध्यापकांनी साडेसातशे तासाहून अधिक अकरावी व बारावी अभ्यासक्रमाच्या अध्यापनाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग तयार केले. यासाठी जिल्हा परिषद,  शिक्षण विभाग , शिक्षणाधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  बीड आणि अंबाजोगाई येथे अध्यापकांद्वारे तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले . पुणे येथील अभिनव टेक्नॉलॉजी लिमिटेड यांनी सदर अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने इझी लर्निंग ॲप द्वारे उपलब्ध करून दिला आहे त्याचे उद्घाटन करून लोकार्पण आज झाले.

कोविड संदर्भात आढावा घेताना पालकमंत्री श्री.मुंडे यांनी कोरोना बाधितांसाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती घेतली. यासह अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुंभार यांनी जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संशयित ११ हजार ७९२ व्यक्तींची स्वॅब तपासणी पूर्ण करण्यात आले असून बीड आणि परळी मध्ये यासाठी महाआरोग्य अभियान राबविण्यात आले होते याच बरोबर जिल्ह्यातील 567 बाधित आढळून आले होते त्यापैकी 283 सध्या विविध ठिकाणी उपचार घेत आहेत अशी माहिती दिली

तसेच या बैठकीत पीक कर्ज, पीक विमा, स्वस्त धान्य दुकान मार्फत अन्नधान्य पुरवठा बाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी उपस्थित  शासकीय विभागांचा प्रमुखांमार्फत पिक विमा, खरीप पीक कर्ज वाटप, रेशन दुकान द्वारे अन्नधान्य पुरवठा आदी  बाबींची तपशीलवार माहिती देण्यात आली. अभिनव टेक्नॉलॉजी लिमिटेडचे श्री भुतडा यांनी याप्रसंगी इजी लर्निंग ॲप बद्दल माहिती दिली

यावेळी अपर  जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार, जिल्हा हा उपनिबंधक सहकारी संस्था शिवाजी बढे , यासह कृषी, पुरवठा,  वने, आरोग्य महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण

बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उप रोप वनात  पालक मंत्री धनंजय मुंडे,  जिल्हाधिकारी राहुल रेखावार आमदार प्रकाश सोळंके आमदार संदीप शिरसागर आमदार बाळासाहेब आजबे आणि आमदार संजय दौंड यांच्या हस्ते रोपांची वृक्ष लागवड करण्यात आली. ८६४ चौ. मी.  क्षेत्रामध्ये ते विषय 2340 वृक्षारोपण ची लागवड करण्यात येत असून यामध्ये विविध प्रकारच्या 52 प्रजातींची झाडे लावण्यात येत आहेत

००००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.