बीड दि.३० जुलै:आठवडा विशेष टीम― आज दि.३० जुलैच्या आलेल्या अहवालात ३७ जण कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह आले आहेत.बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत चांगलीच वाढ होताना दिसत आहे.नागरिकांनी शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
आज आलेल्या अहवालात बीड तालुक्यातील १०, परळी १७ ,अंबाजोगाई ४, गेवराई व माजलगाव प्रत्येकी २ ,आष्टी व केज प्रत्येकी १ अश्या ३७ रुग्णांची आज दिवसभरात वाढ झाली आहे.