मुंबई, दि. ३१ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
बकरी ईद हा पवित्र सण श्रद्धा, प्रेम, बंधुभाव व त्यागाचा संदेश देतो. हा सण साजरा करताना सेवाकार्य तसेच उपेक्षित जनसामान्यांच्या कल्याणाचा विचार केला जातो, ही अतिशय समाधानाची बाब आहे. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनीच गोरगरीब बांधवांच्या हिताचा विचार करणे आवश्यक झाले आहे. बकरी ईदनिमित्त मी राज्यातील सर्व लोकांना विशेषतः मुस्लीम बंधू – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.