अकोला: रॅपिड ॲन्टीजन टेस्ट ,आज दिवसभरात ५७७ चाचण्या ; १४ पॉझिटिव्ह

Last Updated by संपादक

अकोला,दि.31: कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 577 चाचण्यामध्ये 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण भागात आज येथे 104 चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. अकोट येथे 64 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. बाळापूर येथे चाचण्या झाल्या नाहीत. बार्शीटाकळी येथे 126 चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. पातूर येथे चाचण्या झाल्या नाहीत. तेल्हारा येथे 104 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मुर्तिजापूर येथे 95 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच अकोला मनपामध्ये 46 चाचण्या झाल्या त्यात आठ पॉझिटिव्ह आले आहे, अकोला जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 36 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे एकूण 577 चाचण्या होऊन त्यात 14 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 7528 चाचण्या झाल्या असून 367 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.