मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा ‘त्याग, समर्पणाच्या शिकवणीचा वसा घेऊ या’

मुंबई, दि. ३१ : ‘त्याग आणि समर्पणाची शिकवण देणाऱ्या बकरी ईदच्या संदेशाचा वसा घेऊन समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (१ ऑगस्ट रोजी) साजरा होणाऱ्या बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, मुस्लिम बांधवांचा हा पवित्र बकरी ईद  सण त्यागाचा संदेश देतो. त्याग आणि समर्पणातून मानव कल्याणाचा विचार सांगतो. याशिवाय सण साजरा करताना गोरगरीबांचाही विचार करण्यास सांगतो. मानवतेच्या विकासाच्या दृष्टीने दिलेल्या या संदेशाचा वसा घेऊन आपण समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे हा सण आरोग्याची काळजी घेऊन आणि नियमांचे पालन करून शांततेत साजरा करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.