कोविडसंदर्भात राज्यात २ लाख २० हजार गुन्हे दाखल; ३२ हजार पेक्षा अधिक व्यक्तींना अटक

मुंबई दि.३: लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख २० हजार २५६ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३२ हजार ४६७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच १८ कोटी ३६लाख ३९ हजार ४ रु. दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २ ऑगस्ट या कालावधीत

अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ८८ हजार ५२५ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३२४ (८८३ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०९ हजार ११४

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४६

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – १०४

(मुंबईतील ५१ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५५, ठाणे शहर १२  व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी, रायगड २,पुणे शहर ३, नाशिक शहर ३ ,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १ wpc,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना SRPF १ अधिकारी, नवी मुंबई  SRPF १, पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी, ए.टी.एस. १, उस्मानाबाद १, औरंगाबाद शहर १, जालना ग्रामीण १, नवी मुंबई १, सातारा१, अहमदनगर १,औरंगाबाद रेल्वे १, SRPF अमरावती १)

कोरोना बाधित पोलीस – २२० पोलीस अधिकारी व १६७१ पोलीस कर्मचारी

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.