चंद्रपूर,दि.3 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जोखीम पत्करून गावागावातील आपल्या भावा बहिणींचे रक्षण करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील 2 हजारावर आशा ताईंना राखीच्या पर्वावर रोख पुरस्कार व सुरक्षा किट देऊन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याचबरोबर पालकमंत्री आशा किरण योजनेची घोषणा त्यांनी यावेळी केली. राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.
यावेळी खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरनुले, आ.किशोर जोरगेवार, आ. प्रतिभा धानोरकर, उपाध्यक्ष तथा सभापती रेखाताई कारेकार, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, अधिष्ठाता डॉ.राजेंद्र सुरपाम उपस्थित होते.