बार्टी कडून अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त ऑनलाईन विविध कार्यक्रम संपन्न

बीड दि. ४:नानासाहेब डिडुळ― साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती शताब्दी महोत्सव वर्षा निमित्ताने आयोजित पहिल्या सत्रात प्रसिध्द कवी, कांदबरीकार व व्याख्याते डॅा. कैलास दौंड यांचे मार्गदर्शन झाले. दुसर्‍या सत्रात प्रा. अनंत लांडगे यांनी केले एम. पी. एस. सी. पूर्व परीक्षा विषय केले परिपूर्ण मार्गदर्शन केले. तिसर्‍या सत्रात प्रसिध्द कवी, शाहीर व व्याख्याते अंजीराम घनघाव यांचे मार्गदर्शन झाले. चौथ्या सत्रात प्राचार्य हनुमंत सौदागर यांनी अण्णा भाऊ साठे यांचा जिवन प्रवास व साहित्य यावर प्रकाश टाकला. पाचव्या सत्रात प्रमुख व्याख्याते अशोक तांगडे (सामाजिक कार्यकर्ते, बीड) यांनी “भारतीय संविधानातिल मूल्य आणि अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य” या विषयावर मार्गदर्शन केले.*

बीड येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती शताब्दी महोत्सव वर्षा निमित्ताने आयोजित कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळत आधुनिक तंत्रज्ञानाचावापर करून झूम अँपच्या माध्यमात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रथम सत्रात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे नामवंत अभ्यासक, संशोधक, तसेच त्यांच्या विचारांचा चळवळीतून पुढे वारसा चालवणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे ऑनलाईन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयोजन करण्यात आले होते. प्रसिध्द कवि, कांदबरीकार व व्याख्याते डॅा. कैलास दौंड अहमदनगर यांनी ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य’ या विषयावर प्रबोधन केले. त्यांनी आपल्या प्रबोधनपर मार्गदर्शनात सांगीतले की, अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून शोषित, पिडीत व कामगार यांच्या जिवनातील व्यथांची मांडणी करुन त्यांच्यात आत्मभान जागृत करण्याचे मोठे कार्य केले आहे. या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून डॅा. संजय कोठेकर व डॅा. महादेव जगताप हे उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन बार्टीचे समतादूत ज्ञानोबा मात्रे यांनी केले. दुसऱ्या सत्रात अंबाजोगाई तालुक्यातील बार्टी चे समतादूत यांनी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्त एम. पी. एस. सी. पूर्व परीक्षा परिपुर्ण मार्गदर्शन या विषयी चा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. अनंत लांडगे हे लाभले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून झूम अँपच्या माध्यमात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रा. लांडगे सरांनी ऑनलाइन आलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी परिपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंबाजोगाई तालुक्यातील बार्टीचे समतादूत जोशी व्यंकटेश यांनी केले. त्रतीय सत्रात कवि, शाहीर व व्याख्याते अंजीराम घनघाव (माजी सरपंच मोगरा) यांनी ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य’ या विषयावर प्रबोधन केले. त्यांनी आपल्या प्रबोधनपर मार्गदर्शनात सांगीतले की, अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून शोषित, पिडीत व कामगार यांच्या जिवनातील व्यथांची मांडणी करुन त्यांच्यात आत्मभान जागृत करण्याचे मोठे कार्य केले आहे. या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून धुमाळ सर, डाके सर तांबोळी सर आदी हे उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन बार्टीचे पुरुषोत्तम स्वामी, यांनी केले. चौथ्या सत्रात प्राचार्य हनुमंत सौदागर यांनी ‘अण्णा भाऊ साठे यांचा जिवन प्रवास व साहित्य’ यावर प्रकाश टाकला. त्यांनी त्यांच्या विचारातुन गावकुसाबाहेरच जगणं, उपेक्षीतांचा संघर्ष, दु:ख ,दारिद्रय यांच्या कथा कादंबरी, नाटक या मधुन लढा उभा केला. कार्यक्रम सुत्रसंचलन केज तालुका समतादुत रविंद्र नांदे यांनी केले. पाचव्या सत्रात प्रमुख व्याख्याते अशोक तांगडे (सामाजिक कार्यकर्ते, बीड) यांनी “भारतीय संविधानातिल मूल्य आणि अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या विचारातुन अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि त्यांच्या साहित्यातील नायक आणी नायिका यांचे वर्णन केले. जातीव्यवस्था, गरीबी, दु:ख व शोषीतांचा संघर्ष लढा यावर महत्वपूर्ण विचार मांडले. भारतीय संविधानतील मूल्य आणि अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य
यावर साहित्याचा संदर्भ देत आभ्यासपुर्ण प्रकाश टाकला. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती तत्वशिल कांबळे (सामाजिक कार्यकर्ते ), वैद्यनाथ खोडवे, बाजिराव ढाकणे, रुक्मीणी नागापुरे, दिपक खळगे व विनोद आगलावे हे होते तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बीड समतादुत नानाभाऊ गव्हाणे यांनी केले.

धनंजय मुंडे (सामाजिक न्याय व विशेष सहा. विभाग, मंत्री महाराष्ट्र राज्य), विश्वजित कदम (सामाजिक न्याय व विशेष सहा. विभाग, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य), पराग जैन – नैनुटीया (भाप्रसे) (प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहा. विभाग), कैलास कणसे (महासंचालक बार्टी, पुणे), यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीमती प्रज्ञा वाघमारे (मुख्य प्रकल्प संचालिका, समतादूत विभाग बार्टी,पुणे) यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती शताब्दी निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. या कार्यक्रमात बार्टी, पुणे येथुन स.प्रकल्प संचालक दिलावर सय्यद, बीड जिल्हा प्रकल्प अधिकारी सर्वेश्वर कोठूळे, समतादूत अमोल तांदळे, संजय गुजर, मधुसुदन मस्के, प्रदीप गुजर, रवींद्र नांदे, तुकाराम शेवाळे, ज्ञानोबा मात्रे ,
नानाभाऊ गव्हाणे, भीमा कानधरे, स्वामी पुरुषोत्तम, सय्यद अखेब, ज्ञानेश्वर ढगे, व्यंकटेश जोशी, श्रीमती वर्षा देशमुख, आदींसह नामवंत मान्यवर ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.