अहमदनगर जिल्ह्यातील विद्युत विकास कामांना मिळणार गती

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई, दि.5 : अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रलंबित विद्युत विकास कामांबाबत आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात महावितरण व महापारेषणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत जिल्ह्यात नवीन उपकेंद्रे उभारणे तसेच उपकेंद्रांमधील क्षमता वाढ व अति उच्च दाब उपकेंद्रे प्रस्तावित करण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी यावेळी निर्देश दिले.

संगमनेर तालुक्यातील खांबे, खिरविरे, पारेगाव खुर्द येथील उपकेंद्रांच्या उभारणीसाठी तातडीने मंजुरी घेण्याच्या सुचनाही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी केल्या.

संगमनेर तालुक्यातील अति भारित रोहित्रच्या ठिकाणी नवीन रोहित्रे बसवण्यासाठी 50 रोहित्रे तात्काळ देण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.