मुंबई दि. ०६ : राज्यात दि. 1 ऑगस्ट ते दि . 5 ऑगस्ट पर्यंत 884 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 4 लाख 79 हजार 402 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
राज्यात एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलै महिन्यात 30 लाख 3 हजार 474
ऑगस्ट मध्ये आतापर्यंत 4 लाख 79 हजार 402 आणि असे एकूण दि. 1 एप्रिल ते दि . 05 ऑगस्ट या कालावधीत 1 कोटी 24 लाख 62 हजार 405 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे.