मुंबई, दि. ६ : दै. पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर ऊर्फ बाबा शिंगोटे यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या शोक संदेशात श्री चव्हाण म्हणतात.
पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. कोणतीही मोठी आर्थिक ताकद पाठीशी नसताना वितरण क्षेत्रातील अनुभव व इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी एकाहून एक सरस प्रकाशने काढली. त्यांचा जीवनप्रवास नेहमीच स्मरणात राहणारा ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.