NDRF – मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या १६ टीम तैनात – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई दि. ६ :  राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य  करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची  आपत्कालीन यंत्रणा  सज्ज आहे. राज्यात अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ टीम राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणा  सतर्क आहेत. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन ही श्री.वडेट्टीवार यांनी केले आहे.

मुंबई  ५, कोल्हापूर ४ , सांगली २ , सातारा १, ठाणे १, पालघर १, नागपूर १, रायगड १ अशा एकूण १६ एनडीआरएफ च्या टीम  तैनात करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.